MI vs RR: हार्दिक पांड्याने टॉस जिंकला, पण जसप्रीत बुमराहला Playing XI मधून बाहेर केलं; कारण काय सांगितलं?

Mumbai Indians vs Rajasthan Royals Playing XI: आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात आज अखेरचा साखळी सामना आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत.
Jasprit Bumrah | IPL 2026 | MI vs RR

IPL 2026 | MI vs RR

Sakal

Updated on

IPL 2026, MI vs RR: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील रविवारी (२४ मे) साखळी फेरीचा शेवटचा सामना असून या दिवसातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होत आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेला हा सामना दोन्ही संघांचा अखेरचा साखळी सामना आहे.

हा सामना राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफच्या समीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच मुंबईचे मात्र आव्हान अधीच संपले असल्याने त्यांचा हा स्पर्धेतील अखेरचा सामना आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jasprit Bumrah | IPL 2026 | MI vs RR
IPL 2026 Playoff Race: मुंबई विरुद्ध राजस्थान: प्लेऑफची चौथी जागा कोणाची? पाहा सविस्तर समीकरणे!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com