IPL 2026: ऑरेंज असो वा पर्पल कॅप, SRH चेच खेळाड़ू आहेत सध्या ऑन टॉप; पाहा सर्वाधिक धावा अन् विकेट्स घेणारे ५ खेळाडूंची लिस्ट

IPL 2026, Orange & Purple Cap Updates: आयपीएल २०२६ मध्ये बुधवारी सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला पराभूत केले. या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप शर्यतीत मोठे बदल झाले आहेत.
Abhishek Sharma & Eshan Malinga | IPL 2026, Orange & Purple Cap Updates

Abhishek Sharma & Eshan Malinga | IPL 2026, Orange & Purple Cap Updates

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) बुधवारी (२९ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला (SRH beat MI) ६ विकेट्सने पराभूत केले. सनराझर्स हैदराबाद संघाचा हा हंगामातील ६ वा विजय ठरला, तर मुंबई इंडियन्सचा हा ६ वा पराभव ठरला.

त्यामुळे हैदराबादने १२ पाँइंट्ससह पाँइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेल घेतली आहे, तर मुंबई इंडियन्स ९ व्या क्रमांकावरच कायम आहेत. या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीतही बरेच बदल झाले आहेत. या शर्यतीत सध्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून येत आहे.

Abhishek Sharma & Eshan Malinga | IPL 2026, Orange & Purple Cap Updates
IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com