

Vaibhav Sooryavanshi | Irfan Pathan
Sakal
Irfan Pathan on Vaibhav Suryavanshi : राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षांचा स्टार फलंदाजी वैभव सूर्यवंशी सोमवारी पुन्हा चर्चेत आला होता, पण त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी नाही, तर शून्यावर बाद झाल्याने. खरंतर आयपीएल २०२६ (IPL 2026) स्पर्धेत वैभवने (Vaibhav Sooryavanshi) सुरुवातीच्या चारही सामन्यात दणक्यात सुरुवात केली होती.
रविवारपर्यंत ऑरेंज कॅपही त्याच्याकडे होती. पण सोमवारी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तो शून्यावर बाद झाला.
खरंतर हैदराबादच्या संघ त्यांच्या गोलंदाजीसाठी फारसा कधी चर्चेत नसतो. पण असे असतानाच वैभव शून्यावर बाद झाल्याने त्याची चर्चा झाली. याचदरम्यान इरफान पठाणने (Irfan Pathan) त्याच्याबद्दल केलेल्या एका पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.