

Ruturaj Gaikwad | RR vs CSK | IPL 2026
Sakal
RR vs CSK Marathi News : इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सोमवारी (३० मार्च) गुवाहाटीत झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात चेन्नईचे (Chennai Super Kings) सर्वच प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. पण असे असले तरी सामन्यानंतर फार निराश नसल्याचे चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सांगितले.