

Pat Cummins on Vaibhav Sooryavanshi | SRH vs RR | IPL 2026
Sakal
बुधवारी आयपीएल २०२६ स्पर्धेच्या (IPL 2026) एलिमिनेटर सामन्यात (Eliminator) राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला ४७ धावांनी पराभूत केले (RR beat SRH). त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचे या आयपीएल हंगामातील आव्हान संपुष्टात आले, तर राजस्थानने क्वालिफायर २ सामन्याकडे (Qualifier 2) वाटचाल केली.
राजस्थानच्या या विजयात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा (Vaibhav Sooryavanshi) मोठा वाटा होता, त्याच्या वादळी खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. सामन्यानंतर त्याचे हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनेही (Pat Cummins) कौतुक केले.