

Vaibhav Sooryavanshi | RR vs LSG | IPL 2026
Sakal
IPL 2026, RR vs LSG Marathi News: लखनौ सुपर जायंट्स संघाला मंगळवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल २०२६ स्पर्धेत (IPL 2026) पराभवचा सामना करावा लागला. जयपूरला झालेल्या या सामन्यात राजस्थानने ७ विकेट्सने मोठा विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले. राजस्थानच्या या विजयात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा (Vaibhav Sooryavanshi) मोठा वाटा राहिला. त्याने आक्रमक खेळी करताना अनेक विक्रमही मोडले.
या सामन्यात लखनौने मिचेल मार्श (९६) आणि जोश इंग्लिस (६०) यांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानसमोर २२१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग राजस्थानने १९.१ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केला. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने ७ चौकार आणि १० षटकारांसह ३८ चेंडूत ९३ धावा केल्या. त्याला यशस्वी जैस्वाल (४३) आणि ध्रुव जुरेल (नाबाद ५३) यांचीही साथ मिळाली.