India Vs Pakistan
India Vs Pakistan esakal

India Vs Pakistan : पुन्हा भारत - पाकिस्तान थरार! जाणून घ्या कधी अन् कोणत्या मैदानावर होणार सामना

India Vs Pakistan : आयसीसीने पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामन्याचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार असल्याचे सांगितले. आयसीसीनला बक्कळ पैसा मिळवून देणारा हा भारत - पाकिस्तान सामना टी 20 वर्ल्डकप 2024 चा उद्घाटन सामना असण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हा हाय व्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता आहे.

India Vs Pakistan
Irfan Pathan : इरफान पठाणनं इस्त्राइल - हमास युद्धावर केलं ट्विट; कोणाची घेतली बाजू?

आयसीसी 2021, 2022 टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना हा पाकिस्तानसोबत झाला होता. 2021 मध्ये दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला होता. त्यानंतर 2022 मध्ये एमसीजी स्टेडियममध्ये विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला.

आता न्यूयॉर्कपासून 30 किलोमीटर दूर 34 हजार आसन क्षमता असलेल्या तात्पूरत्या स्टेडियममध्ये 2024 ला भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे. हे मैदान इस्ट मेआडोवहच्या इसेनहोव्ह पार्क मधील 930 एकर जागेत उभारले जाणार आहे. हे मैदान मॅनहॅटनपासून 30 किलोमीटर कूर आहे.

India Vs Pakistan
Hardik Pandya : BCCI चे ट्वीट अन् कर्णधार रोहित टेन्शनमध्ये! न्यूझीलंडविरुद्ध काय असणार संघाचे टीम कॉम्बिनेशन?

आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये कॅरेबियन बेटावरील 7 ठिकाणी सामने होणार आहेत. हा वर्ल्डकप 4 जूनला सुरू होईल आणि 30 जूनपर्यंत चालेल. या तारखा आयसीसीने गेल्याच महिन्यात निश्चित केल्या आहे.

यासोबतच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील 3 ठिकाणांचा देखील समावेश आहे. यात डल्लास, फ्लोरिडा आणि न्यू यॉर्क यांचा समावेश आहे. तर वेस्ट इंडीजमधील अँटिग्वा, बार्बुडा, बार्बाडोस, डॉमिनिका, गयाना, सेंट लुसिया, संट व्हिनसेंट, द गार्डियन, त्रिनिदाद अँड टोबॅको यांचा समावेश आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com