Sunil Chhetri
Sunil ChhetriSakal

Sunil Chhetri Video: 19 वर्षे, 151 सामने अन् 94 गोल... सुनील छेत्रीला टीम इंडियाचा सलाम, गार्ड ऑफ ऑनरवेळी अश्रु अनावर

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीला शेवटच्या सामन्यानंतर भारतीय संघाने गार्ड ऑफ ऑनर दिला, यावेळी त्याला त्याचे अश्रु रोखता आले नाहीत.
Published on

Sunil Chhetri last match: भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या १९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची काल अखेर झाली. गुरुवारी (६ जून) भारतीय फुटबॉल संघाचा फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामना कुवेतविरुद्ध झाला. कोलकातामध्ये झालेला हा सामना गोलशुन्य बरोबरीत संपला अन् छेत्रीच्या कारकिर्दीचाही शेवट झाला.

छेत्रीने यापूर्वीच घोषित केले होते की हा सामना त्याचा अखेरचा सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी भावनिक ठरणार हे अनेकांना माहित होते.

अखेर जेव्हा सामना संपल्याचे रेफ्रींनी घोषित केले, तेव्हा स्टेडियममधील संपूर्ण वातावरण भावनिक झाले. भारताचे खेळाडूच्या चेहऱ्यावरही छेत्रीच्या निवृत्तीचे दु:ख आणि सामन्यात विजय मिळवू न शकल्याची निराशा स्पष्ट दिसत होती.

Sunil Chhetri
Sunil Chhetri : हा माझा अखेरचा सामना असेल... भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने अचानक घेतली निवृत्ती, भावुक Video केला शेअर

दरम्यान, छेत्रीने सामन्यानंतर संपूर्ण स्टेडियमला फेरी मारत सर्व प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानले. या सामन्यासाठी ५८ हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. यादरम्यान, छेत्रीचे डोळेही पाणावले होते.

यानंतर भारतीय खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने छेत्रीला गार्ड ऑफ ऑनर दिला, तेव्हा मात्र त्याला त्याचे अश्रु रोखता आले नाही. याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

सुनील छेत्रीने त्याच्या कारकिर्दीत 151 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने 94 गोल केले आहेत. तो 88 सामने कर्णधार म्हणून खेळलाय.

सामना झाला बरोबरीत

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर या सामन्यात दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. तसेच कर्णधार सुनील छेत्रीला अखेरच्या सामन्यात प्रतिमेला साजेशी कामगिरी न आल्याने निराशा झाली.

Sunil Chhetri
Sunil Chhetri : एक पर्व संपलं! सुनिल छेत्रीच्या डोळ्यात तरळले अश्रू; सामना राहिला 0-0 बरोबरीत

फिफा वर्ल्ड कपच्या तिसऱ्या फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला या लढतीत विजय मिळवणे आवश्‍यक होते; पण आता गोलशून्य बरोबरी झाल्यामुळे भारतीय संघाला कतारविरुद्ध होणाऱ्या सामन्यातील निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुसऱ्या फेरीत नऊ गटांमध्ये प्रत्येकी चार संघांची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ तिसऱ्या फेरीत प्रवेश करणार आहेत. इतकेच नाही, तर एएफसी आशियाई करंडकासाठीही पात्र ठरणार आहेत. भारताचा शेवटचा सामना ११ जूनला होणार आहे.

तसेच अफगाणिस्तान आणि कुवेत यांच्यातही सामना होणार आहे. त्यामुळे आता पुढच्या फेरीत पोहचण्यासाठी भारताला कतारविरुद्ध विजय मिळवावा, तर लागेल, पण त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि कुवेत यांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com