दादाच्या फॅन्ससाठी गुड न्यूज; 'चलो टोकिओ ऑलिम्पिक'!

वृत्तसंस्था
Monday, 3 February 2020

चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये क्रिकेटर सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, अभिनेता सलमान खान आणि संगीतकार ए. आर. रेहमान हे भारतीय पथकाचे सदिच्छा दूत होते.

नवी दिल्ली : भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (आयओए) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय संघाचे सदिच्छा दूत बनण्याची विनंती केली आहे. आयओएचे राजीव मेहता यांनी यासंदर्भात गांगुली यांना पत्र लिहिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यात म्हटले आहे की, 'टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतातील सुमारे 200 खेळाडू 14 ते 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतील. यामध्ये वरिष्ठांसह युवा खेळाडूंचादेखील समावेश आहे, जे या खेळांमध्ये प्रथमच खेळणार आहेत. आपण नेहमीच तरुणांसाठी रोल मॉडेल आहात.

- INDvsNZ : शेवटची मॅच न खेळताही कोहलीच्या नावावर दोन रेकॉर्ड!

एक क्रीडा प्रशासक म्हणून आपण नेहमीच तरुण प्रतिभेला उत्तम मार्गदर्शन केले आहे. अशा परिस्थितीत आपण भारतीय पथकात सामील झाल्यास खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि देशातील ऑलिंपिक खेळांनाही उत्तेजन मिळेल. आम्ही आशा करतो की आपण ही जबाबदारी पूर्ण मनापासून हाताळाल.' 

- #AusOpen2020 : ऑस्ट्रेलियन ओपनचा अजिंक्य 'जोकर'; नोव्हाकची आठव्यांदा जेतेपदाला गवसणी!

कारण या वर्षाच्या ऑलिंपिक खेळामध्ये भारताची सहभागीची 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे तुमचे मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या वर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान टोकियोत ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे.

- INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल!

चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये क्रिकेटर सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, अभिनेता सलमान खान आणि संगीतकार ए. आर. रेहमान हे भारतीय पथकाचे सदिच्छा दूत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IOA requests BCCI president Sourav Ganguly to be India Goodwill Ambassador at Tokyo 2020