Ex-MI Player Arrested : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप, पोलिसांनी केली अटक
Ex-Mumbai Indians Player in Assault Case : चार महिन्यांपूर्वी एका तरुणीने शिवालिक विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आता ही कारवाई केली आहे.
मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटूवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली आहे. शिवालिक शर्मा असं या खेळाडूचं नावं आहे. त्याला जोधपूर पोलिसांनी बडोद्यातून ताब्यात घेतलं आहे.