Video : ...आन् पंजाबच्या प्रितीचा श्वासच अडकला

Bhanuka Rajapaksa Catch Preity Zinta reaction
Bhanuka Rajapaksa Catch Preity Zinta reaction esakal

IPL 2022: पंजाब किंग्जने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरूद्धच्या सामन्यात 187 धावा चोपून काढल्या. यात शिखर धवनच्या नाबाद 88 तर भानुका राजपक्षेच्या (Bhanuka Rajapaksa) 42 धावांचा मोठा वाटा होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी रचली. मात्र या भागीदारीत पंजाबच्या फलंदाजांना सीएसकेच्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडून हातभार लावला होता. पंजाबकडून आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या भानुका राजपक्षेवर नशीब मेहराबन होते. त्याचा एक नाही तर दोन दोन झेल सीएसकेच्या क्षेत्ररक्षकांनी सोडले. दरम्यान, पंजाब किंग्जच्या मालकीणबाईंचा, प्रिती झिंटाचा (Preity Zinta) राजपक्षेने दोन वेळा श्वासच अकडवला होता. सध्या प्रितीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Bhanuka Rajapaksa Catch Preity Zinta reaction
बीसीसीआय खेळाडूंना बायो बबलमधून काढणार बाहेर?

भानुका राजपक्षेचा पहिला कॅच कर्णधार रविंद्र जडेजा टाकत असलेल्या 7 व्या षटकात ऋतुराज गायकवाडने सोडला. तर जडेजाच टाकत असलेल्या 9 व्या षटकात मिशेल सँटनरने मिडविकेटला राजपक्षेचा दुसला कॅच (Drop Catch) सोडला. दोन्ही कॅच जडेजाचा गोलंदाजीवर आणि दोन्ही वेळा राजपक्षेचाच कॅच सोडण्यात आला. याच राजपक्षेने शिखर धवन सोबत दुसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी रचली आणि संघाला 147 धावांपर्यंत पोहचवले होते. राजपक्षेने 42 धावांचे योगदान दिले.

Bhanuka Rajapaksa Catch Preity Zinta reaction
PBKS vs CSK : शिखर धवनचा सीएसके विरूद्ध तिहेरी धमाका

ज्यावेळी 7 व्या षटकात राजपक्षेने हवेत उंच फटका मारला होता त्यावेळी पंजाबची मालकीण प्रिती झिंटाचा श्वासच अडकला होता. तिने यावेळी दिलेली रिअॅक्शन खूप व्हायरल होत आहे. मात्र ऋतुराजने हा उंच उडालेला झेल सोडला आणि प्रितीची खळी खुलली. दुसरीकडे सीएसकेचा विकेटकिपर एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा ऋतुराजकडे निराशेने पाहू लागले होते. चेन्नई सुपर किंग्जची आतापर्यंतच्या सामन्यात फिल्डिंग गुणवत्तेला साजेशी अशी झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com