IPL 2024 Delhi Capitals : चार पराभवानंतर दिल्ली संघाने घेतला मोठा निर्णय! 'या' खेळाडूची वाइल्ड कार्ड एन्ट्री

IPL 2024 Delhi Capitals : ऋषभ पंत नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरूवात खूपच खराब झाली.
Delhi Capitals sign Lizaad Williams as Harry Brook replacement News Marathi
Delhi Capitals sign Lizaad Williams as Harry Brook replacement News Marathi

IPL 2024 Delhi Capitals : ऋषभ पंत नेतृत्वाखाली आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरूवात खूपच खराब झाली. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या पाच पैकी एक सामना जिंकला आहे. आणि संघ पॉइंट टेबलमध्ये तळाच्या 10व्या स्थानावर आहे. या सगळ्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीने आपल्या संघात दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा समावेश केला आहे. हॅरी ब्रूकच्या जागी या खेळाडूला संघात संधी मिळाली आहे.

Delhi Capitals sign Lizaad Williams as Harry Brook replacement News Marathi
IPL 2024 : डबल-हेडरनंतर Points Table मोठी उलथापालथ! मुंबईने घेतली झेप, RCB अडचणीत, CSK लाही धक्का

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी हॅरी ब्रूकने आपले नाव मागे घेतले आहे. पण तेव्हा दिल्ली संघाने त्याच्या बदलीची घोषणा केली नव्हती. पण आता हॅरी ब्रूकच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझाद विल्यम्सचा दिल्ली संघात समावेश करण्यात आला आहे. लिझाद विल्यम्स 50 लाखांच्या मूळ किंमतीवर दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाली आहे. (Delhi Capitals sign Lizaad Williams as Harry Brook replacement)

Delhi Capitals sign Lizaad Williams as Harry Brook replacement News Marathi
T20 World Cup : T-20 वर्ल्ड कपमध्ये पंत-सूर्याच्या खेळण्यावर टांगती तलवार... 'या' खेळाडूमुळे होणार पत्ता कट?

लिझाद विल्यम्सने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून 2 कसोटी, 4 एकदिवसीय आणि 11 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत लिझाड विल्यम्सने कसोटीत 3 विकेट्स, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 विकेट आणि टी-20 क्रिकेटमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. लिझाद विल्यम्सने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

Delhi Capitals sign Lizaad Williams as Harry Brook replacement News Marathi
LSG vs GT : चालू सामन्यात DRS वरून राडा, कर्णधार गिल अन् गुजरातचे खेळाडू अंपायरशी भिडले

दिल्ली कॅपिटल्सचा संघ : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, स्वस्तिक चिकारा, यश धुल, समृद्ध नोरखिया, इशांत शर्मा, झ्ये रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दार, ललित यादव, मिचेल मार्श, सुमित कुमार , अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, रिकी भुई, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जॅक फ्रेझर गुर्क आणि लिझाद विल्यम्स.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com