GT vs LSG : गुजरातचे 'मैं झुकेगा नही साला', लखनौकडून हिसकावले अव्वल स्थान

Gujarat Titans Defeat Lucknow Super Giants
Gujarat Titans Defeat Lucknow Super Giants esakal

पुणे : गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंटचा तब्बल 62 धावांनी पारभव करत गुणतालिकेतले आपले अव्वल स्थान पुन्हा पटकावले. लखनौसमोर ठेवलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ 82 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला.

गुजरातकडून फिरकीपटू राशिद खानने भेदक मारा करत 24 धावात 4 बळी घेतले. याचबरोबर त्याने टी 20 मधील आपल्या 450 विकेट देखील पूर्ण केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याला डेव्हिड मिलर 26 आणि राहुल तेवतियाने 22 धावा करत चांगली साथ दिली. (Gujarat Titans Defeat Lucknow Super Giants Regain Top Spot In IPL 2022 Point Table)

Gujarat Titans Defeat Lucknow Super Giants
युवराज सिंगने बॅड पॅचमधील रोहितबाबत केले मोठे वक्तव्य

गुजरातने ठेवलेले 145 धावांचे आव्हान पार करताना लखनौची सुरूवात खराब झाली. यश दयालने क्विंटन डिकॉक आणि करण शर्माला बाद केले तर मोहम्मद शामीने लखनौचा कर्णधार केएल राहुलची मोठी शिकार केली. यानंतर आलेल्या फलंदाजांना देखील डाव सावरता आला नाही. क्रुणाला पांड्या, आयुष बदोनी आणि मार्कस स्टॉयनिस यांनी निराशा केली. त्यांचा राशिद खानच्या भेदक माऱ्यासमोर टिकाव लागला नाही. राशिद खानने लखनौच्या मधल्या फळीचे कंबरडेच मोडले. दरम्यान, एका बाजूने एकाकी झुंज देणारा दीपक हुड्डा देखील 27 धावांवर बाद झाला.

त्यानंतर राशिद खानने दोन षटकार मारत 12 धावा करणाऱ्या आवेश खानला बाद करत लखनौचा डाव 20 षटकात 82 धावांवर गुंडाळला. राशिदने 24 धावात 4 बळी टिपले. तर यश दयाल आणि साई किशोर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. गुजरातकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक 27, तर क्विंटन डिकॉकने 11 धावा केल्या. लखनौच्या फक्त तीन फलंदाजांनाच दुहेरी आकडा पार करता आला. गुजरातने सामना 62 धावांनी जिंकत गुणतालिकेत 18 गुणांसह पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले.

Gujarat Titans Defeat Lucknow Super Giants
जवर्धने महिलेचा Video शेअर करत म्हणाला; लाज वाटली पाहिजे सरकारला

आयपीएल 2022 च्या 57 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र लखनौ सुपर जायंटच्या गोलंदजांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे गुजरातची सुरूवात खराब झाली. मोहसिन खानने वृद्धीमान साहाला पाच तर आवेश खानने मॅथ्यू वेडला 10 तर कर्णधार हार्दिक पांड्याला 11 धावांवर बाद करत गुजरातची अवस्था 3 बाद 51 धावा अशी केली.

त्यानंतर सलामीला आलेल्या शुभमन गिलने चिवट फलंदाजी करत डेव्हिड मिलर सोबत अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र 24 चेंडूत 26 धावा करणाऱ्या मिलरला जेसन होल्डरने बाद केले. दरम्यान अर्धशतक पूर्ण करणाऱ्या शुभमन गिलने शेवटपर्यंत फलंदाजी करत नाबाद 63 धावा केल्या. गिलला राहुल तेवतियाने शेवटच्या षटकात होल्डला 3 चौकार मारत गुजरातला 144 धावांपर्यंत पोहचवले. तेवतियाने 16 चेंडूत 22 धावा केल्या.

Gujarat Titans Defeat Lucknow Super Giants
'छोटी बच्ची हो क्या'; शिखर धवन - प्रिती झिंटाचा जीममधील VIDEO व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com