IPL Final GT vs CSK Rain : राखीव दिवशी देखील पाऊस पडणार, काय म्हणतंय अहमदाबादचं हवामान?

IPL Final GT vs CSK Rain
IPL Final GT vs CSK Rainesakal

IPL Final GT vs CSK Rain : आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच फायनल सामना हा राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. 28 मे रोजी अहमदाबादमध्ये सामन्याच्या वेळेत तुफान पाऊस पडला. त्यामुळे साधी नाणेफेक देखील झाली नाही. पावसाने थोडी उसंत दिली मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने सामना राखीव दिवशी खेळवण्याची घोषणा करावी लागली.

IPL Final GT vs CSK Rain
IPL Final 2023 CSK vs GT : कितीही पाऊस पडू दे, फक्त 30 मिनिटात होतं नरेंद्र मोदी स्टेडियम कोरडं!

आज (दि. 29) आयपीएलची ही बहुप्रतिक्षित फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे. अहमदाबादच्या आजच्या वातावरणाचा विचार केला तर अहमदाबादमध्ये सकाळी ऊन पडले होते. मात्र अहमदाबादमध्ये दुपारी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. जर हा पाऊस नाणेफेकीच्या वेळी आला तर नाणेफेकीला उशीर होऊ शकतो.

मात्र वर्तवलेल्या अंदाजानुसार हा पाऊस कालच्या सारखा मुसळधार नाही. त्यामुळे सामना एखाद्यावेळेस उशिरा सुरू होऊ शकतो मात्र सामना वॉश आऊट होण्याची शक्यता फार कमी आहे.

IPL Final GT vs CSK Rain
MS Dhoni Fan IPL Final : धोनीसाठी चाहते रेल्वे स्टेशनवरही झोपले... काहींना मिळाला विराटचा आडोसा

आजच्या सामन्यात देखील 9 वाजून 36 मिनिटांनी कट ऑफ टाईम सुरू होईल. यावेळापर्यंत जर पाऊस पडत राहिला आणि सामना सुरू झाला नाही तर षटके घटवण्यास सुरूवात केली जाईल. वेस्टर्न डिस्टरबन्समुळे संध्याकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

हवामान खात्यानुसार थोडा पाऊस सामन्यात व्यत्यय निर्माण करू शकतो. मात्र रविवार इतक्या पावसाची काही शक्यता नाही. हवेतील आद्रता 45 - 50 टक्क्याच्या आसपास असणार आहे. हवा 11 किमी प्रती तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

जर सामना झाला नाही तर...

जर आजही पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनीचे सीएसकेला पाचवे विजेतेपद जिंकून देण्याचे स्वप्न भंगणार आहे. कारण पॉईंट टेबलमध्ये टॉपर असलेली गुजरातला विजेता घोषित करण्यात येईल. गुजरातने 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com