Hardik Pandya’s seven stitches above his eye
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सलग सहा विजयांची नोंद केली. मुंबई इंडियन्सने गुरुवारी राजस्थान रॉयल्सवर १०० धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. या सामन्यात रायन रिक्लेटन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांनी फलंदाजीत दम दाखवला. कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह , ट्रेंट बोल्ट व हार्दिक यांनी प्रभावी गोलंदाजी केली. या सामन्यात कर्णधार हार्दिकच्या डोळ्यावर पट्टी दिसली आणि त्याला नेमकं काय झालं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली.