
KKR vs RCB IPL 2025: इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ व्या हंगामातील उद्घाटन सामना आज रंगणार आहे. डिफेंडींग चॅम्पियन्स कोलकाता नाईट रायडर्स आज विराट कहलीच्या सेनेविरूद्ध भिडणार आहे. दोन्ही संघ आज नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. कोलकातामधील इडन गार्डनवर सामना खेळवला जाणार आहे. हवामान खात्याने कोलकातामध्ये पावसाचा अंदाज सांगितला असला, तरीही दोन्ही संघ सामन्यासाठी तयार आहेत. तर आजच्या सामन्यात केकेआर कर्णधार अजिंक्य रहाणे व आरसीबीचा नवा कॅप्टन रजत पटीदार कोणते शिलेदार घेऊन मैदानात उतरणार आहेत हे जाणून घेऊयात.