
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२५ मे) अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. हा सामना चेन्नईचा यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना आहे, तर गुजरातचा प्लेऑफपूर्वीचा अखेरचा साखळी सामना आहे.
या सामन्यात चेन्नईने गुजरातसमोर २३१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नईकडून या सामन्यात सुरुवातीपासूनच खेळाडूंकडून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. डेवॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी अर्धशतकेही केली.