
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ५६ वा सामना मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होत आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातसमोर विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
त्यानंतर गुजरात संघ फलंदाजीला उतरल्यानंतर त्यांनी फॉर्ममध्ये असलेल्या साई सुदर्शनची विकेट दुसऱ्याच षटकात गमावली. सुदर्शनला बोल्टने ५ धावांवर बाद केले. पण त्यानंतर वातावरण बदलाचा या सामन्याला फटका बसतोय की काय, असे चित्र काही काळ निर्माण झाले होते.
सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे शुभमन गिलने अंपायर्सकडे चिंताही व्यक्त केली. पण अंपायर्सने सामना पुढे कायम करण्यास सांगितले होते. त्यामुळे सामना पुढे सुरू राहिला.