
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी (२४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
दोन्ही संघांचा हा या हंगामातील प्रत्येकी ९ वा सामना आहे. या सामन्यासाठीही दुखापतीमुळे राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे उपलब्ध नाही. त्याच्याऐवजी रियान पराग राजस्थानचे नेतृत्व करत आहे.