
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२३ मे) ६५ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४२ धावांनी पराभूत केले. त्यामुळे बंगळुरूने शुक्रवारी पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी जाण्याची संधी गमावली.
बंगळुरूचा हा चौथा पराभव आहे. त्यामुळे ते १७ गुणांवरच कायम राहिले असले तरी नेट रनरेट खालवल्याने ते दुसऱ्यावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. हैदराबादला मात्र २ गुण मिळाले असल्याने त्यांचे आता १३ सामन्यांनंतर ११ गुण झाले आहेत. पण ते ८ व्या क्रमांकावर कायम आहेत.
आता हैदराबादला अखेरचा सामना बाकी आहे, तर बंगळुरूलाही प्लेऑफपूर्वी अखेरचा साखळी सामना अद्याप खेळायचा आहे.