RR vs CSK Live Match Marathi Update: राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा ( Wanindu Hasaranga ) याने सामन्यात पुष्पा फ्लेवर आणला आहे. त्याने त्याच्या तीन षटकांत चेन्नई सुपर किंग्सच्या तीन फलंदाजांना बाद केल्यानंतर पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केलं. त्याला रियान परागने अविश्वसनीय झेल घेऊन मदत केली.