

Nitish Rana controversy
esakal
Nitish Rana Involved in On field Controversy: आयपीएल (IPL) २०२६ च्या हंगामचा चेन्नई सुपर किंग्स(Chennai Super Kings) आणि दिल्ली (Delhi Capitals) कॅपिटल्स यांच्यात काल हंगामाचा 18 वा सामना झाला. नाणेफेक जिंकून दिल्लीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नाबाद ११५ धावा आणि आयुष म्हात्रेसह (Ayush Mhatre)११३ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर चेन्नईने २ बाद २१२ धावा उभ्या केल्या.
ज्यात 36 चेंडूत 59 धावा केल्या. आयुष म्हात्रे 59 धावांवर रिटायर्ड आऊट झाला आणि फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने १० चेंडूंत २० धावा केल्या. फलंदाजी जबरदस्त झाल्यावर चेन्नई सुपर किंग्सची गोलंदाजी चांगली झाली, आणि चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सला 36 धावांनी पराभूत करून हंगामचा पहिला विजय मिळवला. परंतु या सामन्यात वाद देखील झाला. हेमंत बदानी व नितीश राणा यांचा बाऊंड्रीवरच अम्पायरसोबत वाद झाला. यानंतर नितीश राणाला दंड ठोठावण्यात आला.