IPL 2026: "ही फक्त किरकोळ चूक…” SRH विरूद्धच्या पराभवानंतर रियान पराग नेमक काय म्हणाला?

Riyan Parag: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवानंतर रियान परागने राजस्थान रॉयल्सच्या सुरुवातीच्या चुका मान्य केल्या. लवकर पडलेल्या विकेट्स आणि रणनीतीतील त्रुटींमुळे सामना हातातून गेला.
Riyan Parag

Riyan Parag

esakal

Updated on

आयपीएल २०२६ हंगामात आतापर्यंत अपराजित राहिलेला संघ राजस्थान रॉयल्सला काल मोठा पराभव स्वीकारावा लागला. सनरायझर्स हैदराबादने धडाकेबाज फलंदाजी करत राजस्थानला २१७ धावांचं लक्ष्य दिलं होतं, ज्यात हैदराबादचा कर्णधार ईशान किशनने ४४ चेंडूत ९१ धावा केल्या. ईशानचं शतक थोडक्यात चुकलं असलं तरी त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली, कारण सलामीला आलेला अभिषेक शर्मा शून्यावर परतला. त्यानंतर ईशान आणि हेनरिक क्लासेन यांनी चांगली फलंदाजी केली. नंतर सनरायझर्स हैदराबादने राजस्थानला १५९ धावांवरच रोखत मिळालेल्या ५७ धावांच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने कुठे चूक झाली आहे, यावर भाष्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com