

Riyan Parag
esakal
Riyan Parag: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ मध्ये रविवारी अरुण जेटली मैदानावर राजस्थान रॉयल्स(RR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानवर ५ गडी राखून विजय मिळवला. पराभवानंतर राजस्थान संघाचा कर्णधार रियान पराग (Riyan Parag) संतापला. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचलेल्या राजस्थानने या सामन्यात निराशाजनक खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने १९३ धावा केल्या. पाठलाग करायला आलेल्या दिल्लीने हे लक्ष्य १९.२ षटकांत पूर्ण केलं. या खराब कामगिरीनंतर कर्णधार रियान परागने (Riyan Parag) सामन्यानंतर सादरीकरणामध्ये आपल्या संघावर चांगलाच संताप व्यक्त केला आणि कठोर शब्दांत कानउघाडणी केली.