
गुरुवारी (१ मे) मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्ध १०० धावांनी विजय मिळवला. मुंबईचा हा सातवा विजय असून त्यांनी आता प्लेऑफसाठी प्रबळ दावेदारीही ठोकली आहे.
मुंबईने राजस्थानला जयपूरमध्ये ४७२८ दिवसांनी पराभूत करण्याचा पराक्रमही केला आहे. यापूर्वी साल २०१२ मध्ये मुंबईने राजस्थानला जयपूरमध्ये पराभूत केलं होतं.