
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. १८ वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आणि बंगळुरूचं नाव आयपीएल ट्रॉफीवर कोरण्यात आलं. बंगळुरूने रजत पाटिदारच्या नेतृ्त्वात आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले.
मंगळवारी (३ जून) अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केलं. हे विजेतेपद मिळवल्यानंतर बंगळुरूच्या खेळाडूंनी, त्यांच्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले.