
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासह त्यांच्या चाहत्यांना आता पहिल्या आयपीएल विजेतेपदाची स्वप्न पडत असतील. बंगळुरू संघाची इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धेत कामगिरीही तशी झाली आहे.
बंगळुरू संघ आयपीएल २०२५ मध्ये अंतिम सामन्यात पोहचणारा पहिला संघ ठरला आहे. गुरुवारी मुल्लनपूरमध्ये बंगळुरूने क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्सला ८ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.