

Bihar Players Shine Bright in IPL 2026
esakal
Bihar Players Shine Bright in IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ च्या हंगामात आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत आणि प्लेऑफची शर्यत अधिकच रंजक बनली आहे. अजूनही एका स्थानासाठी जोरदार लढत सुरू आहे. आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक युवा खेळाडू आपली छाप सोडताना दिसतात. युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी आयपीएल हे सर्वात मोठं व्यासपीठ मानलं जातं. या हंगामातही अनेक तरुण खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे बिहारमधील तीन खेळाडूंनी या हंगामात जबरदस्त छाप पाडली आहे.