Sanju Samson: स्वतःच्या शतकापेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा! संजू सॅमसनने दिल्लीविरुद्ध नाकारलं शतक; मैदानात नक्की काय घडलं?
SANJU SAMSON LEADS FROM THE FRONT: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनला शतकाची संधी होती, पण त्याने वैयक्तिक विक्रमापेक्षा चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाला प्राधान्य दिलं. नाबाद ८७ धावांची खेळी करत त्याने संघाला शानदार विजय मिळवून दिला.
नवी दिल्ली :आयपीएलचा मोठा अनुभव असला तरी तो संजू सॅमसनसाठी चेन्नई संघातून पदार्पणाचा मोसम आहे. या पहिल्याच मोसमात तो चेन्नई संघाचा तारणहार ठरत आहे. सॅमसन चेन्नई संघाचा कणा असल्याचा गौरव कर्णधार ऋतुराज गायकवाड याने केला आहे.