Shubman Gill IPL 2023: आमच्यासाठी चांगली बॅटिंग केलीस! सचिनचं भन्नाट ट्विट

 Shubman Gill atted well for Mumbai Indians Sachin Tendulkar
Shubman Gill atted well for Mumbai Indians Sachin Tendulkar sakal

Sachin Tendulkar on Shubman Gill : शुभमन गिलच्या जबरदस्त शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला. याचा परिणाम असा झाला की RCB स्पर्धेतून बाहेर पडले आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरली. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शुभमन गिलच्या शतकामुळे मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला आहे आणि त्यामुळेच सचिन तेंडुलकरने हे ट्विट केले आहे.

 Shubman Gill atted well for Mumbai Indians Sachin Tendulkar
RCB IPL 2023: विराटची दोन शतकं, डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅप, पण तरी RCB प्लेऑफमधून बाहेर! ही आहेत अपयशाची कारणं

शुभमन गिलच्या जबरदस्त शतकामुळे गुजरात टायटन्सने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात आरसीबीचा पराभव करून त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा केल्या. विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी करताना सलग दुसरे शतक झळकावले.

मात्र, गुजरात टायटन्सने हे लक्ष्य 19.1 षटकांतच पूर्ण केले. शुभमन गिलने केवळ 52 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने केलेल्या 104 धावांच्या खेळीने संघाला सहज विजय मिळवून दिला आणि आरसीबीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

 Shubman Gill atted well for Mumbai Indians Sachin Tendulkar
IPL 2023: प्लेऑफमधून बाहेर गेल्यावर RCB कर्णधार टीमवरच बरसला; 16व्यांदा स्वप्नभंग होण्याचेही सांगितले कारण

त्याचवेळी सचिन तेंडुलकरने एका ट्विटमध्ये कॅमेरून ग्रीनच्या खेळीचे कौतुक केले, ज्याने मुंबई इंडियन्सला सामना जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय दुसऱ्या सामन्यातील शुभमन गिल आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीचेही त्याने कौतुक केले. सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मुंबई इंडियन्सकडून शुभमन गिल आणि कॅमेरून ग्रीन यांनी चांगली फलंदाजी केली. विराट कोहलीने उत्कृष्ट खेळी करत बॅक टू बॅक सेंच्युरी झळकावली. प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सला पाहणे खूप छान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com