ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार; काय म्हणतोय सेहवाग? Virender Sehwag Statement About Ruturaj Gaikwad CSK Captaincy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virender Sehwag said Ruturaj Gaikwad good captaincy Option

ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार; काय म्हणतोय सेहवाग?

आयपीएल 2022 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ना मैदानावर ना मैदानाबाहेर चांगली कामगिरी करत आहे. सीएसके प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. तर सीएसकेने हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी निवडलेल्या कर्णधाराला (Captain) हंगाम अर्ध्यावर असतानाचा आपली कॅप्टन्सी सोडावी लागली. एवढेच नाही तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) नाराज असल्याच्या बातम्या देखील आल्या. तर आज अंबाती रायुडूने निवृत्तीचे ट्विट करून नंतर डिलीट केल्याने सीएसकेमध्ये सगळे काही आलबेल नाही यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, धोनीने जर नेतृत्व पुन्हा एकदा हातात घेतली. मात्र भविष्याच्या दृष्टीकोणातून सीएसकेचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा सीएसकेचा कर्णधार म्हणून दीर्घकाळासाठी एत चांगला पर्याय असल्याचे वक्तव्य केले.

हेही वाचा: प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त; IPL सुरू असतानाच रोहित निवडसमितीला भेटणार

विरेंद्र सेहवाग म्हणाला की, ऋतुराज गायकवाडला कर्णधारपदावर दावा सांगण्यापूर्वी दोन ते तीन हंगामात सातत्यपूर्ण फलंदाजी करून दाखवावी लागेल. ऋतुराज गायकवाडने 2021 च्या हंगामात ऑरेंज कॅप मिळवत सीएसकेला विजेतेपदा पर्यंत पोहचवले.

सेहवाग पुढे म्हणाला की, 'कोणीही एखाद्या हंगामात चांगली कामगिरी करू शकतो. जर त्याने तीन ते चार हंगामात चांगली कामगिरी केली. तर तो सीएसकेसाठीचा धोनी (MS Dhoni) नंतरचा दीर्घकालीन कर्णधार बनू शकतो. धोनी इतका यशस्वी कर्णधार का होता. कराण तो शांत स्वभावाचा आहे, तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. तो आपल्या गोलंदाज आणि फलंदाजांचा चांगल्या प्रमाणे वापर करून घेतो. तो नशीबवान देखील आहे. मात्र जो धाडसी असतो त्यालाच नशीब देखील साथ देते. त्यामुळे धोनी हा एक धाडसी कर्णधार आहे. त्याच्याकडे देखील महेंद्रसिंह धोनीसारखी गुणवत्ता आहे. फक्त एका बाबतीत काही सांगू शकत नाही. ते म्हणजे त्याचे लक फॅक्टर.'

हेही वाचा: विराट बाद झाल्यावर पंजाबने केली पोस्ट; चाहते झाले फिदा

'त्याने महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. तो खूप शांतपणे खेळतो. त्याने शतक जरी ठोकले तरी तो भावनांचे प्रदर्शन करत नाही. तो शुन्यावर बाद झाला तरी तो शांतच असतो. तो शतक केल्यानंतर आनंदी आहे किंवा शुन्यावर बाद झाल्यानंतर नाराज आहे हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कळणार नाही. त्याच्याकडे नियंत्रण आहे. तो शांत आहे. त्याच्याकडे एक चांगला नेता होण्यासाठीचे सर्व गुणधर्म आहे.'

Web Title: Virender Sehwag Said Ruturaj Gaikwad Good Captaincy Option For Chennai Super Kings

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top