esakal | क्रीडाविश्वासाठी आशेचा किरण; कोरोनाच्या संकटातही युरोपातील 'ही' प्रतिष्ठेची फुटबॉल लीग पार पडली.. वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

football league

सेविलाने रेयाल बॅटिसचा 2-0 असा पराभव केला आणि तीन महिन्यांनंतर प्रतिष्ठेच्या ला लीगा स्पॅनिश फुटबॉलचे पुनरागमन झाले. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे बंद पडलेल्या व्यावसायिक लीगसाठी आणखी एक आशेचा किरण दिसला आहे. कोरोना संकटानंतर सुरू झालेली ही युरोपातील दुसरी आणि फुटबॉलविश्वातील पाचवी लीग आहे.

क्रीडाविश्वासाठी आशेचा किरण; कोरोनाच्या संकटातही युरोपातील 'ही' प्रतिष्ठेची फुटबॉल लीग पार पडली.. वाचा सविस्तर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस ः  सेविलाने रेयाल बॅटिसचा 2-0 असा पराभव केला आणि तीन महिन्यांनंतर प्रतिष्ठेच्या ला लीगा स्पॅनिश फुटबॉलचे पुनरागमन झाले. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे बंद पडलेल्या व्यावसायिक लीगसाठी आणखी एक आशेचा किरण दिसला आहे. कोरोना संकटानंतर सुरू झालेली ही युरोपातील दुसरी आणि फुटबॉलविश्वातील पाचवी लीग आहे. जर्मनीतील बुंडेस्लिगाने दाखवलेल्या मार्गावर आता जागतिक फुटबॉल हळूहळू सुरू होत आहे. रामोन सँचेझे पिझुआन येथे एरवी होणाऱ्या सेविली डर्बीच्या लढतीसाठी  यजमान सेविलीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येतात;  पण या वेळी ही लढत रिकाम्या स्टेडियममध्ये झाली.

वाचा ः कोरोनाची लागण झाल्यांनतर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात...

ला लीगातील अखेरची लढत 10 मार्च रोजी झाली होती. बुंडेस्लिगानंतर आता ला लीगा सुरू झाल्यानंतर लंडनमधील प्रीमियर लीग आणि इटलीतील सिरी ए पुढील आठड्यात सुरू होण्याच्या मार्गावर आहे. लुकास ओकाम्पोसने 56 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केल. त्यानंतर फर्नांडो रेगेसने दुसरा गोल केला. त्यामुळे 2-0 असा विजय मिळवणारे सेविला गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहेत. बार्सिलोना आघाडीवर असून रेयाल माद्रिद दुसऱ्या स्थानावर आहे. तीन महिन्यानंतर लीग पुन्हा सुरू झाल्यामुळे पुढच्या 39 दिवसांत उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी ला लीगाला शर्थ करावी लागणार आहे. प्रत्येक संघाला तीन किेवा पाच दिवसांनंतर दुसरा सामना खेळावा लागणार आहे. या धावपळीत खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा कस लागणार आहे.

वाचा ः आनंदाची बातमी, मुंबईत तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात

पाच राखीव खेळाडूंचा वापर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन त्यामुळे खेळाडूंची तंदुरुस्ती अव्वल दर्जाची नसली आणि पुढे अधिक सामने खेळायचे असल्याने फिफाने पाच राखीव खेळाडू वापरण्याची मुभा दिली आहे. सेविला आणि रेयाल बॅटिस या दोन्ही संघांनी पाच राखीव खेळाडू मैदानात आणले. तसेच ड्रिंग्स ब्रेकचाही वापर केला.

वाचा ः लंडनहून भारतात परतेल्या मुलीची हृदयद्रावक कहाणी; आठ दिवसांनंतरही रिपोर्ट नाही, विमानसेवा आणि हॉटेलच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

लवकरच प्रेक्षकांचीही उपस्थिती
कोरोनाच्या संकटानंतर लवकरात लवकर मैदानात येऊ असा विश्वास आम्हाला होता, असे ला लीगाचे अध्यक्ष जेव्हियर तेबास यांनी सांगितले. लीगचा अखेरचा सामना 19 जुलैपर्यंत होईल. तोपर्यंत 10 ते 15 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता स्टेडियम रिकामे असल्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांचे आवाज घुमत असतात;  मात्र टीव्हीवरून सामने पहाणाऱ्यांसाठी वर्च्युअल प्रेक्षक आणि त्यांचे आवाज निवडायचा पर्याय मिळत आहे. फिफाच्या संगणक गेममधून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

वाचा ः लॉकडाऊनमध्ये एसटीने शोधला उत्पन्नाना नवा मार्ग; 21 लाखांचे मिळाले उत्पन्न

स्वागताला 200 पाठीराखे
तत्पूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू मास्क आणि ग्लोज घालून स्टेडियमध्ये आले. प्रत्येकाचे तापमान तपासण्यास आले. खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर 200 पाठीराखे उपस्थित होते. पण काही वेळातच ते दूर झाले. प्रेक्षकांची गर्दी होऊ नये म्हणून 600 पोलिस तैनात करण्यात आले होते.