Lionel Messi fifa 2022: मेस्सी होणार 'मालामाल'! मिळणार खच्चून नोटा...

जगभरामध्ये मेस्सीचे चाहते आहे. त्यानं आपल्या खेळानं चाहत्यांना भारावून टाकले आहे.
Lionel Messi FIFA World Cup 2022 winner total net worth
Lionel Messi FIFA World Cup 2022 winner total net worth

Lionel Messi: जगभरामध्ये मेस्सीचे चाहते आहे. त्यानं आपल्या खेळानं चाहत्यांना भारावून टाकले आहे. गेल्या काही वर्षांपासून मेस्सीच्या लोकप्रियतेमध्ये आणि त्याच्या कमाईमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आता तर त्यानं वर्ल्ड कपवर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा भाव वाढणार आहे.

फिफा २०२२ चा वर्ल्ड कप अर्जेटिनानं आपल्या नावावर करताच नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी आपला आवडता खेळाडू मेस्सीवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉलपटू म्हणून मेस्सीचं नाव घेतलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे बाजारपेठेत मेस्सीच्या नावाला चांगलाच मागणी आली आहे. वर्ल्ड कपनंतर त्याच्यावर पैशांचा पाऊस होणार असल्याचे म्हटले जात आहे. कोट्यवधी रुपयांचे करार करणाऱ्या मेस्सीची बार्गेनिंग पावरही आता वाढणार आहे. त्याचे कारण विश्वविजेत्या संघाचा कर्णधार असणे हे आहे. असे बोलले जात आहे.

ऑन फिल्ड कमाई किती आहे?

फोर्ब्सनं प्रकाशित केलेल्या एका यादीनुसार मे २०२१ ते मे २०२२ दरम्यान मेस्सीनं ऑन आणि ऑफ फिल्ड कमाई ही १३० मिलियन डॉलर होती. त्यामध्ये त्यानं ७५ मिलियन डॉलर आणि ऑफ फिल्ड ५५ मिलियन डॉलरची कमाई ही मेस्सीनं केली होती. आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याच्यावर पैशांची बरसात होणार आहे. यावर मेस्सीच्या चाहत्यांनी त्याच्या कमाईविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. मेस्सीला जगभरातील मोठे ब्रँड आपल्या प्रॉडक्टच्या जाहीरातीसाठी साईन करण्याच्या तयारीत असणार असल्याचे बोललं जातंय.

Lionel Messi FIFA World Cup 2022 winner total net worth
Deepika trolled fifa: मोठ्या तोऱ्यात गेली दीपिका ट्रोल झाली, नेटकऱ्यांनी झाडलं! 'तुला तर...'

मेस्सी हा जगातील सर्वात जास्त श्रीमंत असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सर्वोच्च स्थानी आला आहे. मेस्सीनं यंदाच्या वर्षी एका सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून डील साईन केली होती. त्यामध्ये त्या कंपनीला त्याला दरवर्षी २० मिलियन डॉलर द्यावे लागत होते. यावरुन मेस्सी हा किती महागडा सेलिब्रेटी आणि खेळाडू आहे हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. अॅडिदासनं तर त्याच्यासोबत आजीवन करार केला आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळांडूंमध्ये मेस्सीच्या नावाचा समावेश केला जातो.

Lionel Messi FIFA World Cup 2022 winner total net worth
FIFA WC22: अर्जेंटिनावर पैशांचा पाऊस! जाणून घ्या कोण किती झालं मालामाल

असं म्हटलं जातं की, नोव्हेंबर २०२२ पर्यत मेस्सीची एकुण संपत्ती ही ६०० मिलियन डॉलर (४ हजार ९५२ कोटी) एवढी होती. त्याच्याकडे बार्सिलोनामध्ये असणाऱ्या बंगल्यामध्ये एक प्रायव्हेट फुटबॉल फिल्ड देखील आहे. तो बंगला नो फ्लाय झोनमध्ये येतो. एवढ्या प्रकारच्या त्याला सुविधा देण्यात आल्या आहेत. विश्वविजेत्या मेस्सीच्या संघाला आता ३४४ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com