बांगलादेशच्या 21 वर्षीय क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

शोजिबच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, तो मानसिक तणावाखाली असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

ढाका-  बांगलादेशाचा 21 वर्षीय क्रिकेटपटू मोहम्मद शोजिबने दुर्गापूर येथील आपल्या राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्थानिक पोलिसांनी आत्महत्येला दुजोरा दिला आहे. मोहम्मद शोजिबने 2018 मध्ये अंडर 19 विश्वचषकात देशाचे प्रतिनिधीत्व केले होते. 

शोजिब हा उजव्या हाताने फलंदाजी करत असत. त्याने आपला अखेरचा सामना ढाका प्रीमियर लीगमध्ये शाइनपुकुर क्रिकेट क्लबकडून खेळला होता. तो 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषकात राखीव खेळाडू होता. 

हेही वाचा- कशी होती दिवाळी; कशी असेल दिवाळी?

बांगलादेश क्रिकेट मंडळाचे संचालक खालिद महमूद यांनी एका प्रतिभाशाली क्रिकेटपटूचा दुर्देवी अंत झाल्याचे म्हटले. खालिद महमूद हे राजशाही येथे बांगला ट्रॅक अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक होते. शोजिबने 2008 मध्ये प्रशिक्षण सुरु केले होते. 

हेही वाचा- 'काँग्रेसला उत्तरेच शोधायची नाहीयेत; आत्मपरिक्षणाची वेळही निघून गेलीय'

एका बांगलादेशी वृत्तपत्राशी बोलताना महमूद म्हणाले की, मला विश्वास बसत नाहीये. अत्यंत दुःखद बातमी आहे. तो एक सलामीचा फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होता. त्याने शाइनपुकुर क्रिकेट क्लबकडून त्याने भरपूर क्रिकेट खेळले आहे. 

राजशाहीकडून प्रथमश्रेणीचे सामने खेळणार तन्मय घोष म्हणाला की, तो दीर्घ काळापर्यंत खेळू शकला असता. त्याने मोठी मेहनत घेतली होती. त्याच्या आत्महत्येबाबत ऐकून खूप वाईट वाटले. 

हेही वाचा- बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी सिमल्यात मजा करत होते, आरजेडी नेत्याचा आरोप

दरम्यान, शोजिबच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, तो मानसिक तणावाखाली असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आगामी बंगबंधू टी 20 मालिकेतूनही त्याला वगळण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्या खेळातही सातत्य नव्हते. पोलिस तपास करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mohammad sozib suicide 2018 bangladesh under 19 world cup squad