नदालला फ्रेंच ओपनमध्ये मिळणार टक्कर; फ्रान्स सरकार जोकोविचवर मेहरबान

Novak Djokovic get Relief For French Open
Novak Djokovic get Relief For French Open esakal

पॅरिस : येत्या महिन्यापासून फ्रान्सने (France) लसीकरणासंदर्भातील नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) होणार आहे. त्याचा फ्रेंच ओपनमधील (French Open) सहभाग यामुळे सुखकर होण्याची शक्यता आहे. फ्रान्सचे पंतप्रधान जेन कास्टेक्स यांनी गुरूवारी आता 14 मार्चपासून देशातील लोकांना स्टेडियममध्ये आणि हॉटेलमध्ये जाताना लसीकरण (Vaccination) केल्याचा पुरावा दाखवणे बंधणकारक नाही असे जाहीर केले. (Novak Djokovic get Relief For French Open)

Novak Djokovic get Relief For French Open
INDvsSL Live: भारताने नाणेफेक जिंकली; फक्त दोन वेगवान गोलंदाज खेळणार

या निर्णयामुळे लस न घेतलेल्या नोव्हाक जोकोविचला मे महिन्यात होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये सहभागी होता येणार आहे. मे महिन्यापर्यंत जर निर्बंध अधिक कडक झाले नाही तर तो या ग्रँडस्लॅममध्ये (Grand Slam) सहभागी होऊ शकतो. फ्रान्सचे पंतप्रधान कास्टेक्स यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, 'आपल्या एकत्रित प्रयत्नांनी देशातील कोरोनाची स्थिती सुधार आहे. त्यामुळे आम्ही 14 मार्चपासून निर्बंधांमध्ये काही शिथिलता देत आहोत. जेथे जेथे लसीकरणाचे प्रमाणपत्र देणे सक्तीचे होते तेथे आता प्रमाणपत्र दाखवण्याची सक्ती केली जाणार नाही.'

Novak Djokovic get Relief For French Open
'मेरे रहाणे - पुजारा आएंगे' रोहित शर्माने पत्रकार परिषदेत दिले संकेत

नोव्हाक जोकोविचला जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया ओपनमधून (Australian Open) लसीकरणाबाबतची माहिती लपवल्याकारणाने माघार घ्यावी लागली होती. त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रकरणानंतर जोकोविचने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की तो येणाऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत लसीकरणाची सक्ती झाली तर स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेणार आहे.

नोव्हाक जोकोविचने आतापर्यंत 20 ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. त्यात त्याच्या नावावर 2 फ्रेंच ओपन टायटल आहेत. ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घ्यावी लागल्याने राफेल नदालचा विश्वविक्रमी 21 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा मार्ग सोपा झाला होता. आता फ्रेंच ओपनमध्ये फेव्हरेट असणाऱ्या नदालला कडवी टक्कर देण्यासाठी जोकोविच सज्ज असणार आहे.

फ्रान्सच्या नियमातील शिथिलतेमुळे जोकोविचला एप्रिलमध्ये होणाऱ्या माँटे कार्लो मास्टर्समध्ये (Monte Carlo Masters) देखील सहभाग घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com