Explainer : गर्लफ्रेंडचा खून करणारा ऑलिंपिक विजेता 'ब्लेड रनर' येणार तुरूंगाबाहेर; काय आहे ही रिस्टोरेटिव्ह जस्टिस?

Oscar Pistorius Restorative Justice DCS
Oscar Pistorius Restorative Justice DCS esakal

Oscar Pistorius Restorative Justice DCS : माजी पॅरालम्पिक स्टार ऑस्कर पिस्टोरियस आज ( दि 04) 11 वर्षानंतर जेलमधून बाहेर येणार आहे. त्याला गर्लफ्रेंड रीवा स्टीनकॅम्पचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. मात्र आता त्याला पॅरोल देण्यात आला असून तो दक्षिण आफ्रिकेच्या रिस्टोरेटिव्ह जस्टिस कार्यक्रमाअंतर्गत तुरूगातून बाहेर येणार आहे.

ब्लेड रनर नावाने प्रसिद्ध झालेल्या ऑस्कर पिस्टोरियसला व्हॅलेंटाईन डे दिवशीच गर्लफ्रेंडचा खून केल्या प्रकरणी 13 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याला 2023 च्या मार्च महिन्यातच पॅरोल मंजूर झाला होता. त्याने 13 वर्षापैकी अर्धी शिक्षा भोगली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या करेक्शनल सर्व्हिस विभागाने नोव्हेंबरमध्ये सांगितले की आता पिस्टोरियस हा उरलेली शिक्षा ही देशाच्या कम्युनिटी करेक्शन्स सिस्टमद्वारे पूर्ण करेल.

Oscar Pistorius Restorative Justice DCS
T20 World Cup : रोहित - विराट टी 20 मध्ये करणार कमबॅक; बीसीसीआयला स्पष्टच सांगितलं

काय आहेत DCS चे नियम?

तो डिपार्टमेंट ऑफ करेक्शनल सर्व्हिसच्या निगराणीखाली असणार आहे. त्याला डिसेंबर 2029 पर्यंत पॅरोलचे सर्व नियम लागू असणार आहेत.

त्याच्यासाठी एक देखरेख अधिकारी नियुक्त केला जाईल. पिस्टोरियसने या अधिकाऱ्याला नोकरी करण्याचं ठिकाण आणि घर बदलत असल्यास त्याची माहिती या अधिकाऱ्याला द्यावी लागेल.

नियमानुसार पिस्टोरियसला दारू, प्रतिबंधित पदार्थाचं सेवन करण्यास बंदी घातली आहे. तर माध्यमांशी देखील बोलण्यावर बंधने घालण्यात आली आहेत.

पिस्टोरियसला दिवसातील काही तास त्याच्या घरी जाण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. DCS ने दिवसातील कुठल्या वेळी त्याला घरी थांबता येणार आहे हे मात्र स्पष्ट केलेलं नाही.

पिस्टोरियसला जेंडर बेस हिंसा रोखण्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रमाला देखील उपस्थित रहावे लागणार आहे. तसेच रागावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे सेशन देखील सुरू ठेवायचे आहेत.

Oscar Pistorius Restorative Justice DCS
Sunil Gavaskar : सॉरी तुम्ही फलंदाज नाही कारण... सुनिल गावसकरांनी कोणाला हाणला टोला?

पिस्टोरियसची तुरूंगवासातून का सुटका झाली?

पिस्टोरियसचा पॅरोल मान्य होण्याची अनेक कारणं आहेत. त्यात त्याच्या गुन्ह्याचं स्वरूप, पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता, तुरूंगातील त्याची वागणूक, शारिरीक आणि मानसिक आरोग्य आणि त्याला बाहेर काढल्यानंतर तुरूंगातील इतर कैद्यांना असलेला संभाव्य धोका या सर्वाची समिक्षा करून हा निर्णय घेण्यात येतो.

पिस्टोरियसला रिस्टोरेटिव्ह जस्टिस प्रोग्राममध्ये देखली सहभाग घेतला होता. या कार्यक्रम आफ्रिकेतील श्वेतवर्णीयांची सत्ता गेल्यानंतर अस्तित्वात आला होता. हा कार्यक्रम गुन्हेगारी जास्त समावेशक पद्धतीनं हाताळण्यासाठी तयार करण्यात आली.

ही पद्धत दक्षिण आफ्रिकेतील युरोपियन वसाहतवादापूर्वी स्थानिक रहिवासी गुन्हेगारी कमी करण्यासाठी वापरत होते. या पद्धतीत शिक्षेपेक्षा गुन्हातील दोन्ही पक्षांना एकत्र आणून तोडगा काढण्यावर भर असतो.

रिस्टोरेटिव्ह जस्टिस प्रोग्राममध्ये पीडित आणि गुन्हेगार यांच्यात संवाद निर्माण करणे आणि दोन्ही पक्षांना एक तोडगा काढण्यापर्यंत घेऊन जाणे हा महत्वाचा भाग असतो. मात्र त्यातील सहभाग हा ऐच्छिक असतो.

पिस्टोरियसला 2021 मध्ये स्टीनकॅम्प कुटुंबीय राहत असलेल्या ठिकाणापासून जवळ असलेलल्या तुरूंगात हलवण्यात आलं होतं.

रीवाचे वडील बॅरी स्टीनकॅम्प आणि पिस्टोरियस या दोघांमध्ये 22 जून 2022 मध्ये चर्चा देखील झाली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com