esakal | बाबर आझमचा विश्वविक्रम; विराटसह वॉर्नरला टाकलं मागे
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam

बाबर आझमचा विश्वविक्रम; विराटसह वॉर्नरला टाकलं मागे

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पाकिस्तानचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज बाबर आझम याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंडविरोधात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 158 धावांची शतकी खेळी करत बाबरने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यात बाबरने आपलं 14 वे एकदिवसीय शतक पूर्ण केलं. या शतकासह सर्वात कमी डावांत 14 शतकं पुर्ण करण्याचा पराक्रम बाबरने केला आहे. बाबरने ८१ सामन्यात 14 शकतं करण्याचा कारनामा केला आहे एवढ्या कमी सामन्यांमध्ये क्रिकेट विश्वात कोणीही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 शतके पूर्ण केली नाहीत. बाबरने हा विश्वविक्रम रचताना भारताचा कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नर, हशिम अमलासारख्या दिग्गज खेळाडूंना जोरदार धक्का दिला आहे....

बाबरने 81 डावांत 14 शतकं झळकावत हाशीम आमलाचा विक्रम मोडीत काढला आहे. आमलाने 84 सामन्यात 14 शतके झळखावली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीला 103 सामने लागली होती. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 98 सामने तर डिव्हिलियर्सला 131 सामने खेळावे लागले होते. त्यामुळे आता हा विश्वविक्रम बाबरच्या नावावर जमा झाला आहे.

हेही वाचा: फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड भाजप नगरसेविकाचं डेंग्यूमुळे निधन, परिसरात हळहळ

पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव -

इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या बाबार आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पाकिस्तान संघाचा तीन एकदिवसीय सामन्यात 3-0 च्या फरकाने मानहाणीकारक पराभव झाला आहे. इंग्लंडच्या दुय्यम दर्जाच्या संघाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाने दिलेल्या 332 धावांचं आव्हान 48 व्या षटकांत पार केलं. बाबर आझमची(158) शतकी खेळीला मोहम्मद रिजवान (74) आणि इमाम उल हक (56) यांच्या अर्धशतकाचं बळ मिळालं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं निर्धारित 50 षटकांत 331 धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्तान संघानं दिलेल्या 332 धावांचं आव्हान जेम्स विन्स याच्या शतकी खेळीच्या बळावर सहज पार केलं.

हेही वाचा: नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे?

हेही वाचा: काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

loading image