Rachin Ravindra : रचिन रविंद्रने 25 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला! कसोटीच्या दोन्ही दिवशी केला मोठा विक्रम

Rachin Ravindra Test Record NZ vs RSA : रचिन रविंद्रने एकाच खेळीने कसोटीतील सरासरी पोहचवली 50 पार
Rachin Ravindra
Rachin Ravindraesakal

Rachin Ravindra Test Record NZ vs RSA : न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्रने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात मोठा धमाका केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही दिवशी मोठे विक्रम केले. पहिल्या दिवशी रचिन रविंद्रने शतक ठोकले होते. न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा मान रचिनने पटकावला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रचिन रविंद्रने 366 चेंडूत 240 धावांची शतकी खेळी केली. त्यात त्याने 26 चौकार आणि तीन षटकार मारले. त्याने आपली ही इनिंग 65 च्या स्ट्राईक रेटने केली. या खेळीद्वारे त्याने न्यूझीलंडचा फलंदाज मॅथ्यू सिनक्लेर याचा 25 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला. मॅथ्यूने 1999 मध्ये पदार्पणाच्या सामन्यात वेस्ट इंडीज विरूद्ध 214 धावा केल्या होत्या. तो विक्रम रचिनने मोडला.

Rachin Ravindra
Shreyas Iyer IND vs ENG : बदला घ्यावा तर अय्यरनं! तिसऱ्या दिवशी स्टोक्सनं खेळी संपवली चौथ्या दिवशी श्रेयसनं वचपा काढळा

रचिनच्या कसोटी कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने पहिल्या सहा इनिंगमद्ये 18 च्या सरासरीने 73 धावा केल्या होत्या. मात्र आता चार कसटी आणि 7 डावात त्याने 313 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 52.16 पर्यंत पोहचले आहे. त्याचे यापूर्वी कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद 18 धावा होती. आता ती 240 झाली आहे.

रचिन रविंद्र हा 24 वर्षे आणि 79 दिवसांचा आहे. तो न्यूझीलंडकडून कसोटीत द्विशतक ठोकणारा दुसरा सर्वात तरूण फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सिनक्लेरने 24 वर्षे आणि 47 दिवस इतकं वय असताना कसोटीत द्विशतक ठोकलं होतं.

रचिन रविंद्रने गेल्या वर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली. त्याने 10 सामन्यात 578 धावा केल्या. तो वर्ल्डकपमधील चौथा सर्वाधिक धावा करणार फलंदाज ठऱला. त्याची सरासरी ही 106.44 इतकी होती. त्याने वर्ल्डकपमध्ये तीन शतके आणि दोन अर्धशतकी खेळी केल्या. त्याला नुकतेच 2023 साठी आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला आहे.

Rachin Ravindra
Rahul Dravid On Ishan Kishan : आम्ही संपर्कात! राहुलनं इशानबाबत दिली मोठी अपडेट; रोहितसह इतर फलंदाज रणजी खेळणार?

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडने पहिल्या डावात 511 धावा केल्या आहेत. रचिनच्या 240 धावांसोबतच केन विलियम्सननेही 118 धावांची शतकी खेळी केली होती. त्याचे हे कसोटीतील 30 वे शतक होते. तर ग्लेन फिलिप्सने 39 आणि डेरेल मिचेलने 34 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून नाईल ब्रँडने पदार्पणाच्या कसोटीत 119 धावात 6 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com