Sanath Jayasuriya : श्रीलंकेत या! जयसूर्याने भारतीयांना केली विनंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanath Jayasuriya Appeal Indians To Visit Sri Lanka

Sanath Jayasuriya : श्रीलंकेत या! जयसूर्याने भारतीयांना केली विनंती

Sanath Jayasuriya : श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने भारतीयांना एक खास विनंती केली आहे. त्याने भारतीयांना जास्तीजास्त संख्येने श्रीलंकेला भेट देण्याची विनंती केली आहे. यामुळे आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेला या संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. श्रीलंकेच्या पर्यटनाचा ब्रँड अॅम्बेसिडर असलेल्या सनथ जयसूर्याने श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासाकडून बुधवारी आयोजित एक कार्यक्रमात हे आवाहन केले. (Sri Lanka Economical Crisis)

हेही वाचा: Umran Malik | मी असतो तर उमरान मलिकला घेतलं असतं : माजी निवडसमिती अध्यक्ष

सनथ जयसूर्या म्हणाला की, 'आमच्यासाठी मागील तीन - चार महिने खूप कठिण होते. त्यावेळी भारतासह इतर देशातही याबबातचे सविस्तर वृत्तांकन झाले. मात्र आता मला वाटतं की श्रीलंकेतील बदललेल्या परिस्थितीनंतर आम्ही वेगळ्या रोड मॅपवर चालत आहोत. आम्ही एका नव्या दिशेने जाण्यास इच्छुक आहोत.

हेही वाचा: BCCI ची मोठी घोषणा! मोहम्मद सिराजचा टीम इंडियात समावेश; बुमराहची जागा घेणार

जयसूर्या पुढे म्हणाला की, 'मला असं वाटतं की पर्यटनाच्या क्षेत्रात श्रीलंकेला विशेष मदत करण्याची गरज आहे. एक छोटा देश असल्याने श्रीलंका हा जास्तीकरून पर्यटनावर अवलंबून आहे. येणाऱ्या पर्यटकांना देण्यासाठी श्रीलंकेकडे खूप काही आहे. सध्याच्या घडीला आम्हाला भारताकडून समर्थन हवं आहे. मला आशा आहे की भारताचे लोक श्रीलंकेला पूर्ण समर्थन देतील.'