Commonwealth Games: पोलिओचा सामना, कौटुंबिक छळ अन् आता सुवर्णपदक! भारताच्या शर्मिला धनखरने ग्लासगोमध्ये घडवला इतिहास

Sharmila Dhankar Wins Historic CWG Gold: ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत शर्मिला धनखरने सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला आहे. ती सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली पॅरा-ऍथलिट ठरली.
Sharmila Dhankar Wins Historic Gold Medal | Commonwealth Games

Sharmila Dhankar Wins Historic Gold Medal | Commonwealth Games

Sakal

Updated on

Sharmila Dhankar Secures Gold: ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी सोमवार (२७ जुलै) खास ठरला. दिवसभरात भारतीय खेळाडूंनी ६ पदके जिंकले. या स्पर्धेत शर्मिला धनखरने सुवर्णपदकाला गवसणी घालत इतिहास घडवला आहे. या स्पर्धेतील पाचव्या दिवशी तिने गोळा फेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, त्यामुळे ती सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली पॅरा-ॲथलिट ठरली आहे.

तिने सोमवारी महिलांच्या F57 गोळा फेक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने ९.८१ मीटर लांब गोळा फेकत हे पदक जिंकले. त्यामुळे तिने पॅरा ऍथलेटिक्समध्ये भारतासाठी २० वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. दरम्यान याच प्रकारात भारताच्या शिल्पा के.शायलाने कांस्यपदक जिंकले. त्यामुळे आता राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत १० पदके जिंकली असून ज्यात २ सुवर्णपदके, ५ रौप्य पदके आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

Sharmila Dhankar Wins Historic Gold Medal | Commonwealth Games
Commonwealth Games: नाशिकच्या सर्वेश कुशारेचा ग्लासगोमध्ये डंका ऐतिहासिक रौप्य पदक जिंकत उंचावली तिरंग्याची शान
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com