राज्य कबड्डी दिनही लांबणीवर, कधी असतो हा दिवस जाणून घ्या..

kabaddi
kabaddi

मुंबई : राज्यातील कबड्डी, खेळाडू, पंच तसेच संघटकांचा गौरव होणारा राज्य कबड्डी दिनाचा वार्षिक कार्यक्रम यंदा लांबणीवर पडणार असल्याचीच चिन्हे दिसत आहेत. दरवर्षी कबड्डी महर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनी हा कार्यक्रम होतो. मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडणार असल्याचीच चिन्हे आहेत. राज्य कबड्डी संघटना काही वर्षांपासून नियमितपणे या कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. एवढेच नव्हे, तर या कार्यक्रमाचे संयोजन करण्याचा बहुमान मिळवण्यासाठी जिल्हा संघटना प्रयत्नशील असतात. या निमित्ताने कबड्डीचा ऑफ सिझन असलेल्या पावसाळ्यात कबड्डी पदाधिकारी आगामी मोसमाबाबत चर्चाही करीत असत. मात्र या वेळी या कार्यक्रमाची प्राथमिक चर्चाही झाली नसल्याचे समजते. 

जुलैत होणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी मार्च - एप्रिलमध्ये सुरू होते आणि त्याच वेळी पुरस्कार विजेत्यांच्या निवडीची प्रक्रियाही सुरू होत असे; मात्र या वेळी लॉकडाऊनमुळे यासंदर्भातील बैठकही होऊ शकली नसल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या लॉकडाऊनमुळे मार्चपासून राज्य कबड्डी संघटनेचे कार्यालय बंद आहे, त्यामुळे विविध पुरस्कारांसाठी संलग्न जिल्हा संघटनांकडून सूचनाही मागवणे शक्‍य झाले नाही, याकडे पदाधिकारी लक्ष वेधत आहेत. 

कोरोनामुळे संघटनांचे कामच थांबले आहे. मार्चमध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाले, त्या वेळी संघटनेची कार्यालय तीन महिन्यांपेक्षा जास्त बंद राहतील, याची कल्पनाही केली नव्हती. अर्थातच त्यामुळे भविष्यातील कार्यक्रमाचाही फारसा विचार झाला नव्हता. आत्ताची परिस्थिती खेळासाठी पोषक नाही, सगळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. खुल्या कार्यक्रमांना नजीकच्या कालावधीत मंजुरी मिळण्याची शक्‍यताही कमी आहे, असेही पदाधिकारी सांगतात. 

खेळाडूंच्या शिष्यवृत्त्यांचा प्रमुख प्रश्न 
राज्य संघटना कबड्डी दिनी ज्येष्ठ कबड्डी खेळाडू, ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ कार्यकर्ता, कृतज्ञता पुरस्कार, श्रमयोगी कार्यकर्ता, उत्कृष्ट महिला तसेच पुरुष खेळाडू, क्रीडा पत्रकार पुरस्कार, उत्कष्ट निवेदक पुरस्कार देत असते. मात्र नवोदित खेळाडूंसाठी मोलाचा असलेला पुरस्कार म्हणजे नवोदित खेळाडूंना मिळणारी शिष्यवृत्ती. त्यासाठी कुमार तसेच किशोर गटासाठी प्रत्येक विभागातील तीन-तीन खेळाडूंची निवड होते. त्याचबरोबर राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या जिल्ह्यासह स्पर्धा आयोजन पुरस्कार तसेच सर्वोत्तम कार्यरत जिल्हा पुरस्कारही दिला जातो. 

खेळाडूंच्या पुरस्कारांबरोबरच ज्येष्ठ पंच, ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कारही महत्त्वाचे असतात. तो त्यांच्या कार्याचा गौरव असतो. दरवर्षीप्रमाणे 15 जुलैला राज्य कबड्डी दिनाचा कार्यक्रम होणार नाही, हे खरे असले तरी तो शक्‍य तितक्‍या लवकर आयोजित करण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. 
- राज्य कबड्डी संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी

sport news Find out when the state kabaddi day is also on extension

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com