आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर कोण भडकले ? काय आहे "तारीख पे तारीख'चे प्रकरण...

`icc cricket
`icc cricket

मुंबई : आयपीएलला कोंडीत पकडण्यासाठी ऑस्ट्रेलियातील ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या भवितव्याबाबत "तारीख पे तारीख'चा खेळ करणाऱ्या आयसीसीला ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्टसने खडसावले आहे. सद्यपरिस्थितीची विचारणा करणारी दोन स्वतंत्र पत्रे त्यांनी आयसीसी आणि भारतीय क्रिकेट मंडळाला पाठवली आहेत. 

स्टार स्पोर्टसकडे बीसीसीआयप्रमाणे आयसीसीच्याही स्पर्धांच्या प्रक्षेपणाचे हक्क आहेत. भारतातील कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली आहे आणि ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडकासंदर्भात आयसीसी अद्यापही निर्णय लांबवत आहे. त्यामुळे स्टार स्पोर्टस नाराज झाले आहेत. 

आम्हाला पुढील टीव्ही कार्यक्रम निश्‍चित करायचा असतो. मार्केंटिंग आराखडाही तयार करायचा असतो; तसेच या मोठ्या स्पर्धांसाठीही जाहिराती तयार करायच्या असतात. त्यामुळे तुम्ही वेळेत निर्णय घ्या, असा उल्लेख स्टार स्पोर्टसने या पत्रात केलेला असल्याचे समजते. अजून आम्ही वाट पाहू शकत नाही, असाही इशारा देण्यात आला आहे. 

आयपीएल आणि विश्‍वकरंडकसारख्या स्पर्धांचे प्रक्षेपण हक्क मिळवताना आम्ही मोजलेली किंमत फार मोठी आहे. आयपीएलसाठी आम्ही मार्केटमधून तीन हजार कोटी घेतलेले आहेत. मार्केटचीच परिस्थिती बिकट आहे, अशा वेळी आणखी उशीर आम्हाला तोट्यात आणणारा ठरेल, असे स्टार स्पोर्टसने म्हटले आहे. दरम्यान, 2020 या आयपीएलच्या प्रक्षेपण हक्काची किंमत कमी करावी, अशी मागणीही स्टार स्पोर्टसने बीसीसीआयकडे केल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. 

जागतिक क्रिकेटमध्ये स्टार स्पोर्टस हे सध्याचे मोठे ब्रॉडकास्टर्स आहे. आयपीएलसह देशातील सामन्यांचे त्यांनी पाच वर्षांसाठी प्रक्षेपण हक्क मिळवलेले आहेत; तर 2015 ते 2023 पर्यंत त्यांच्याकडे आयसीसीच्या स्पर्धांचे हक्क आहेत. 

आकडे बोलतात... 

  • 16,347 कोटी ः आयपीएल हक्क पाच वर्षांसाठी 
  • 6138 कोटी ः भारतातील सामन्यांचे हक्क (2018 ते 2023) 
  • 1.9 अब्ज डॉलर ः आयसीसीच्या स्पर्धांचे हक्क (2015 ते 2023)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com