नाद करा पण आमचा कुठं! विराटने पाहताच पांड्या तोंड लपून पळाला| Virat Kohli Sneers At Hardik Pandya After Smashing Him For Boundary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाद करा पण आमचा कुठं! विराटने पाहताच पांड्या तोंड लपवून पळाला
नाद करा पण आमचा कुठं! विराटने पाहताच पांड्या तोंड लपून पळाला

नाद करा पण आमचा कुठं! विराटने पाहताच पांड्या तोंड लपवून पळाला

आयपीएल 15 सीझनमध्ये नव्याने पदार्पण केलेला गुजरात टायटन्स संघ फॉर्मात आहे. मात्र, काल झालेल्या सामन्यात आरसीबी संघाकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला. इतकेच नव्हे तर गुजरातच्या संघाला स्लेजिंगलादेखील सामोरं जावं लागलं. त्यामुळे क्रिकेट जगतात सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे.

विराट कोहलीने या सामन्या 54 चेंडूत 73 धावा केल्या. खराब फॉर्मनंतर त्याने मोठी खेळी केल्याने त्याची चर्चा सुरु आहे. पण दुसरीकडं एक वेगळीच चर्चा रंगली आहे. सामन्यादरम्यान विराट हार्दिक पांड्याला चिडवताना दिसला. आणि ते पाहून पांड्याने आपला चेहरा झाकला. त्याची चर्चा क्रिकेटच्या वर्तुळाच चांगलीच रंगली आहे.

सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याने आपला चेहरा झाकला असल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा: विराट कोहलीला धोका : ज्याला गिफ्ट केली बॅट त्यानेच घेतली विकेट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाच्या चौथ्या षटकात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्यासमोर विराट कोहली स्ट्राइकवर होता. चौथ्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने सलग दोन चौकार मारले. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर हार्दिक आणि कोहली यांच्यात वाद झाला.

हेही वाचा: त्या ९० मिनिटांमुळे 'विराट' खेळी झाली शक्य

त्यानंतर पांड्याने चौथ्या षटकातील तिसरा चेंडू विराट कोहलीच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. पण, या चेंडूवर किंगनेही बॅट फिरवली आणि जबरदस्त शॉट मारला. या चेंडूवर तो स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न करत होता. पण, तेथील क्षेत्ररक्षक राशिद खानच्या हाताला चेंडू लागला आणि चौकार गेला.

लागोपाठ 2 चेंडूत 2 चौकार मारल्यानंतर विराट कोहलीने आक्रमक हावभाव करत हार्दिक पांड्याला चिडवायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत त्याच्या डोळ्यांचे हावभाव पाहून हार्दिक पांड्याही चेहरा लपवताना दिसला.

हेही वाचा: भारतासाठी आशिया चषक आणि T20 विश्वचषक जिंकून देण्याची इच्छा : विराट

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ट्विटर यूजरने ट्विट केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेक नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

विराटच्या 73 धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरातचे 169 धावांचे आव्हान 8 गडी राखून पार केले. आरसीबी या विजयानंतर गुणतालिकेत 16 गुण मिळवत चौथ्या स्थानावर पोहचली आहे.

Web Title: Virat Kohli Sneers At Hardik Pandya After Smashing Him For Boundary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top