Astro Tips: गुबगुबित गालाच्या पुरुषाला कौंटुबिक सुख अधिक, सामुद्रिक शास्त्र सांगते.. | Samudrik Shastra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips: गुबगुबित गालाच्या पुरुषाला कौंटुबिक सुख अधिक, सामुद्रिक शास्त्र सांगते..

ज्योतिषशास्त्रानुसार शरिराच्या प्रत्येक अवयवाचा तुमच्या नशिबावर फरक पडतो. मग तुमचा हात असो की पाय असो की डोळे. शरीराच्या प्रत्येक अवयव माणसाच्या स्वभाव आणि नशीबाबद्दल सांगतात. आज आम्ही तुम्हाला सामुद्रिक शास्त्रात लिहिल्याप्रमाणे गालाच्या सौंदर्यावरुन तुमचं नशीब सांगणार आहोत.

हेही वाचा: Astro Tips : नखं कापण्याबद्दल ही गोष्ट माहित आहे का? या दिवशी नखं कापल्याने होईल फायदा

प्रत्येकाच्या गालाचे सौंदर्य वेगवेगळे असते. त्याचा आकार, रंग एवढंच काय तर स्कीन ही वेगवेगळी असते. सामुद्रिक शास्त्रानुसार गालाच्या या सर्व बाबींवर माणसाचे नशीब अवलंबून असते. विशेष म्हणजे पुरुष आणि स्त्रियांचे गाल हे वेगवेगळे असतात. चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Astro Tips: पुढे तुमच्या आयुष्यात काय होणार? शरीरातील नसेचं तडतडणं देतं चांगले वाईट संकेत

पुरुष

  • गुबगुबीत गाल असणार्‍या पुरूषांला कौटुंबिक सुख अधिक असतं या शिवाय त्यांना हव्या त्या गोष्टीत सहज यश मिळतं.

  • टवटवीत गुबगुबीत गाल असणारे पुरुष खर्च करताना विचार करत नाही त्यामुळे त्यांना पैशाची बचत करण्यास अवघड जातं. यामुळे त्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.

  • ज्या पुरुषांच्या गालावर मासचं नसतं असे पुरुष नेहमी दुखी असतात. त्यांना नेहमी आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास सहन कराव लागतो.

  • ज्या पुरुषांचे गाल पसलेले असतात, त्यांच्याकडे संपत्तीची कधीच कमतरता नसते. नोकरी असो वा व्यवसाय असे पुरुष कामाच्या ठिकाणी नावलौकीक मिळवतात. त्यांना फार मेहनत घ्यावी लागत नाही.

हेही वाचा: Astro Tips : माहिती आहे का? मांजरला धनलक्ष्मी यंत्र का म्हणतात

स्त्रिया

  • टवटवीत गाल असणाऱ्या महिला साक्षात लक्ष्मी असतात. त्यांच्या हातात नेहमी पैसा असतो.

  • रखरखीत गाल हे अशुभ समजले जाते. त्यामुळे अशा गाल असणाऱ्या स्त्रियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

  • ज्या महिलांच्या गालावर सुरकुत्या असतात त्यांच्याकडे पैसा फारसा टिकत नाही.

  • याशिवाय खरबडे खड्डे पडलेल्या गालाच्या महिलांना भरपूर पैसे मिळवण्याची कायम इच्छा असते मात्र त्यांना पैसे कमवताना अनेक अडचणी येतात.

  • स्वच्छ आणि गोल गाल असलेल्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात. त्यांना कोणतीही गोष्ट सहज मिळते.

टॅग्स :AstrologyAstrologist