Beauty Tips For Lips : उन्हाळ्यात ओठ कोरडे पडलेत? हे घरगुती उपाय करतील मदत!

उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी पडते, त्यावर काय करायचं?
Beauty Tips For Lips : उन्हाळ्यात ओठ कोरडे पडलेत? हे घरगुती उपाय करतील मदत!

Beauty Tips For Lips : आपल्या घराच्या किचनमध्ये प्रत्येक आजारावर औषध आहे. म्हणून तर आजही अनेक घरात सर्दी पडशावर औषध न घेता. घरातल्या काढ्याचा उपयोग केला जातो. उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांवरही घरचे किचन उपयोगी आहे.

उन्हाळ्यात आपल्या शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो. त्याचा परिणाम त्वचेवरही होतो. उन्हाळ्यात यासोबत अनेक समस्या उद्भवतात.

उन्हाळा सुरू होताच शरीरात अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. टॅनिंग, सनबर्न आणि त्वचेच्या इतर अनेक समस्यांवर तुम्ही पार्लरमध्ये उपाय शोधू शकता, परंतु एक समस्या अशी आहे ज्यावर लोक फारसे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे ती वाढतच जाते. ती म्हणजे ओठ रुक्ष होणे.

ओठांचीही तीच अवस्था होते. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ओठ फाटू लागतात. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य खूपच कमी होते. फाटलेले ओठ, जर त्याची काळजी घेतली नाही तर त्यातून रक्त बाहेर पडू लागते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर त्यावर काय उपाय करायचे हे पाहुयात.

Beauty Tips For Lips : उन्हाळ्यात ओठ कोरडे पडलेत? हे घरगुती उपाय करतील मदत!
Upper Lip : अप्पर लिपचे काळवंडलेपण कसे कमी कराल ?

मध लावा

जर तुम्हालाही फाटलेल्या ओठांचा त्रास होत असेल तर तुम्ही त्यावर मध लावू शकता. असे म्हटले जाते की मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. हे लावल्याने तुमचे ओठ मऊ राहतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याच्या मदतीने लिप बाम तयार करू शकता.

दुधाची साय

तुम्हालाही रूक्ष ओठांचा त्रास होत असेल. तर, दुधाची साय तुमची यातून सुटका करू शकेल. त्यासाठी दुधाची साय ओठांवर लावल्याने फायदा होतो.

बदाम तेल

तुम्ही लिप बामचा नियमीत वापर करत असाल. तर त्याला बदाम तेल हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्यासाठी रोज रात्री लिप्सवर बदाम तेल लावा. यामुळेही तुम्हाला फायदा होतो.

Beauty Tips For Lips : उन्हाळ्यात ओठ कोरडे पडलेत? हे घरगुती उपाय करतील मदत!
Dry Lips : या चुकांमुळे तुमचे ओठ सुकतात

हळद आणि दूध

हळद अनेक आजारांवर औषध म्हणून काम करते. ओठांना ठिक करण्यासाठीही हळद आणि दुधाची घट्ट पेस्ट बनवा. ती ओठांवर लावा आणि थोड्यावेळाने ओठ धुवून टाका.

Beauty Tips For Lips : उन्हाळ्यात ओठ कोरडे पडलेत? हे घरगुती उपाय करतील मदत!
Lips Care Tips: ओठ झालेत काळे; हा बदल करून मिळवा गुलाबासारखे Soft Pink Lips

नारळ तेल

नारळ तेलाचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतातील अर्धे लोक केसांवर लावण्यासाठी हे तेल वापरतात. तेच तेल तुमच्या ओठांचे सौंदर्य अबाधित ठेवेल. फुटलेले रूक्ष ओठ मुलायम बनवण्यासाठी नारळ तेलाने दिवसातून दोन तीन वेळा मसाज करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com