Chanakya Niti : आयुष्य सुखाने जगायचं? 'या' ५ सवयी आताच बदला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chanakya Niti

Chanakya Niti : आयुष्य सुखाने जगायचं? 'या' ५ सवयी आताच बदला

Change These Habits : चाणक्यानीति शास्त्र लोकांना आयुष्यात सफल होण्यासाठी प्रेरित करत आहे. त्यांच्यानुसार जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. काही लोकांना यश मिळते तर कोणाला नाही. चाणक्यानीति शास्त्र यशस्वी जीवनासाठी कानमंत्र दिले आहेत.

हेही वाचा: Chanakya Niti: पुरुषांच्या 'या' गोष्टी महिला करतात लगेच नोटीस

समाज आणि लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक गोष्टी सूत्र स्वरूपात मांडल्या आहोत. त्यातच त्यांनी काही अशा सवयींचा उल्लेख केला आहे, ज्या माणसासाठी शत्रू सिध्द होतात आणि माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. त्यामुळे या सवयी बदलणे आवश्यक असतात.

हेही वाचा: Chanakya Niti : तरुणांनो! उज्ज्वल भविष्याच्या विचारात असाल तर 'या' गोष्टींपासून दूर रहा

या सवयी बदला

चुकीच्या पध्दतीने पैसे कमवा

जे लोक चुकीच्या पध्दतीने पैसकमवतात त्यांच्याकडे फारकाळ पैसे टिकत नाही. त्यांच्या घरात एवढ्या समस्या असतात की, इच्छा असूनही त्याचे सुख घेऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्य सुखाने जगायचे असेल तर पैसा मेहनत आणि इमानदारीने जगा.

हेही वाचा: Chanakya Niti : 'हे' काम केले तर, लक्ष्मी देवी होते प्रसन्न अन् बरकत येते.

आळस सोडा

जे लोक आळशी असतात आणि सतत अंथरूणावर पडलेले असतात त्यांचं नशिबपण झोपूनच राहतं. लक्ष्मीची अवकृपा होते. अशा लोकांना दारिद्र्याला सामोरं जावं लागतं.

हेही वाचा: Chanakya Niti: रागात असताना 'या' चार लोकांशी चुकूनही भांडू नका, नाहीतर…

खादाड वृत्ती

ज्यांचे मन सतत खाण्याकडे असतं, जे लोक कायम आवश्यकते पेक्षा जास्त खातात ते कायमच आजाराला निमंत्रण देतात. त्यांच्याकडे पैसा कधी टिकत नाही. त्यांच्याकडे कायमच पैशाची कमतरता असते. जे लोक दात घासत नाहीत त्यावर लक्ष्मीची अवकृपा होते. व दारिद्र्य येते.

हेही वाचा: chanakya NIti: चुकूनही ‘या’ गोष्टींना पाय लावू नका, नाहीतर करावा लागेल आयुष्यभर पश्चाताप

कटू शब्द बोलणे

जे लोक आपल्या वाणीवर संयम न ठेवता कटू शब्द बोलतात. ते नाहमीच कोणाचे न कोणाचे मन दुखवतात. अशा लोकांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येतात. त्यांच्याकडे पैसा टिकत नाही.

हेही वाचा: Chanakya Niti : या गुणांशिवाय यश मिळणे कठीण, नाहीतर अपयश निश्चित

घरात अस्वच्छता

जे लोक आपले दात साफ करत नाहीत, जे घर स्वच्छ करत नाहीत त्यांना विविध रोगांनी ग्रासले जाते. पैसा वायफळ खर्चात जातो. लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे, अशा लोकांकडे लक्ष्मी थांबत नाही.

टॅग्स :Adopt Good Habits