Cold & Cough Remedies : बदलत्या वातावरणात सर्दी खोकला झालेत हट्टी, स्वयंपाक घरातले हे पदार्थ करतील त्यांची सुट्टी!

काहीवेळा अनेक उपाय,औषधे घेऊनही कफ बरा होत नाही, तेव्हा या गोष्टी वापरून पहा.
Cold & Cough Remedies
Cold & Cough Remediesesakal

Cold & Cough Remedies :  

हिवाळ्याला सुरूवात झाली की आपले शरीर अनेक साथीच्या आजारांचे घर बनते. सुरूवात घसा दुखीने होते, त्यानंतर हळू हळू अंगदुखी आणि सर्दीला सुरूवात होते. सर्दी थोडी कमी आली असं वाटतं तोच घशात असलेल्या कफचे खोकल्यात रूपांतर होते. आणि घरात एखाद्याला सर्दी झाली की सगळ्यांनाच होते.  

हिवाळ्याच्या सुरुवातीला अगदी सौम्य असलेला सर्दी आणि खोकला अनेक दिवस राहतो. सामान्यत: बदलत्या ऋतूमध्ये संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो, त्यामुळे खोकला आणि सर्दीच्या तक्रारी सामान्य असतात. कोरोना सारख्या विषाणूनंतर तर सर्दी खोकल्याची भितीच लोकांना वाटू लागली आहे. 

Cold & Cough Remedies
Cold-Cough: बालकांचा सर्दी-खोकला लवकर बरा होईना; पालकांना टेन्शन

अशा काळात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला थोडासा घसा दुखत असेल तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा आणि स्वयंपाकघरात असलेल्या काह मसाले आणि सोप्या पदार्थांनी हा आजार बरा होऊ शकतो.

स्वयंपाक घरात असलेले मसाले केवळ जेवणाची लज्जत वाढवण्यासाठीच आहेत असं नाही. तर, ते तुमच्या आरोग्याचीही काळजी घेतात. काहीवेळा अनेक उपाय,औषधे घेऊनही कफ बरा होत नाही. तेव्हा या पद्धतींचा वापर करून पहा.

Cold & Cough Remedies
Side Effects Of Cold Drinks : कोल्डड्रिंक्स आवडीने पिताय? मग, जाणून घ्या 'हे' दुष्परिणाम

सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्याचे उपाय

गूळ आणि आले

जर तुमचा सर्दी आणि खोकला औषध घेऊनही बरा होत नसेल. तर तुम्ही नियमितपणे आले आणि गूळ मिसळून सेवन करू शकता. हे कप काढून टाकण्यास मदत करेल. गूळ गरम करून वितळवून त्यात आल्याची पेस्ट मिक्स करून कोमट झाल्यावर खावी.

मध आणि आले

मध आणि आले यांचे मिश्रण सर्दी, खोकला आणि घसादुखीवर जोरदार हल्ला करते. यासाठी एक आले बारीक करून त्यात मध मिसळा. दिवसातून ३ ते ४ वेळा याचे सेवन केल्यास खोकल्यापासून आराम मिळेल.

Cold & Cough Remedies
Cough Cold Home Remedy: ताप, सर्दी आणि खोकल्यासाठी या Ayurvedic Tea चे करा सेवन, मिळेल आराम

लिंबू आणि कांद्याचा रस

जेव्हा छातीत खूप कफ जमा होतो तेव्हा तुम्ही लिंबू आणि कांद्याचा रस यांचे मिश्रण पिऊ शकता. यासाठी कांदा सोलून बारीक वाटून घ्या. कांद्यातील रस बाजूला काढा आणि नंतर त्यात लिंबाचा रस पिळा. हे मिश्रण तूम्ही दिवसातून दोन वेळा सेवन करू शकता. यामुळे घशात अडकलेला कफ निघून जाईल. (Cold & Cough)

मध आणि काळी मिरी

मध आणि काळी मिरीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे संसर्गजन्य रोगांशी लढण्याची ताकद मिळते, म्हणूनच हा मसाला सर्दी आणि खोकल्यामध्ये खूप गुणकारी आहे. यासाठी काळी मिरी पावडर घेऊन त्यात मध मिसळून त्याचा तिखटपणा दूर करून गरम करा. याचे सेवन केल्याने आराम मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com