Dark Circles Remedy: डोळ्यांभोवती आलेल्या Dark Circles ची समस्या एक अन् उपाय आहेत अनेक

लाइफस्टाइलमध्ये करा हा बदल
Dark Circles Remedy
Dark Circles Remedyesakal

Dark Circles Remedy: डोळ्यांखालची काळी वर्तुळे ही केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही मोठी समस्या आहे. हे जास्त स्क्रीन पाहणे, खूप कमी झोप, तणाव आणि इतर अनेक कारणांमुळे असू शकते. जर तुम्हीही डार्क सर्कल्सने त्रस्त असाल तर दुधाचा वापर करून

तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता, कारण डार्क सर्कलच्या उपचारासाठी दूध खूप फायदेशीर आहे. यात त्वचा उजळवणारे गुणधर्म असतात.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये अनुवांशिक, वृद्धत्व, कोरडी त्वचा, जास्त अश्रू, संगणकासमोर जास्त वेळ काम करणे, मानसिक आणि शारीरिक तणाव, झोपेची कमतरता आणि पौष्टिक आहाराचा अभाव यांचा समावेश आहे. (Dark Circles)

Dark Circles Remedy
Dark Circles : डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी खा हे पदार्थ

डार्क सर्कलची समस्या कोणाला होऊ शकते. 

तसं पाहिलं तर डार्क सर्कलची समस्या कोणालाही उद्भवू शकते. परंतु, या समस्येमुळे सर्वाधिक जे लोक प्रभावित होतात, त्यामध्ये : 

1. वयस्कर व्यक्ती 

2. अनुवांशिक समस्या

3. उशिरापर्यंत काम डार्क सर्कलची समस्या कोणाला होऊ शकते. 

डार्क सर्कल्सपासून सुटका कशी मिळवायची?

बदाम तेल आणि दूध

 थंड दुधात थोडे बदामाचे तेल घालावे. या तयार मिश्रणात कापसाचे दोन गोळे बुडवून ठेवा. कापसाचे गोळे डोळ्यांवर अशा प्रकारे ठेवा की ते काळी वर्तुळे झाकून ठेवतात. हे गोळे १५-२० मिनिटे ठेवा. यानंतर ताज्या पाण्याने धुवून घ्या.  हा उपाय दररोज करा.

थंड दूध

काळे सर्कल कमी करण्यात दूधही मदत करते. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये थोडे थंड दूध घ्या. त्यानंतर त्यात कापसाचे दोन गोळे भिजत ठेवावे. कापसाचे गोळे डोळ्यांच्या वर अशा प्रकारे ठेवा की यामुळे काळी वर्तुळे कायमची निघून जातील.२० मिनिटानंतर कापसाचे गोळे काढून टाका. नंतर चेहरा ताज्या पाण्याने धुवून घ्यावा. आपण दररोज तीन वेळा हा प्रयोग करू शकता. (Home Remedies)

Dark Circles Remedy
डार्क सर्कलवर घरगुती आणि कायमस्वरूपी उपाय! Dark Circles

गुलाबजल आणि दूध

थंड दूध आणि गुलाबजल समप्रमाणात मिसळा. मिश्रणात दोन कॉटन पॅड भिजत ठेवा. त्यांना आपल्या डोळ्यांच्या वर ठेवा. डार्क सर्कल लावून झाकून ठेवा. २० मिनिटे ठेवल्यानंतर कॉटन पॅड काढून थंड पाण्याने चेहरा धुवा. डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी आठवड्यातून 20 वेळा दुधासोबत ही प्रक्रिया करावी. 

चहाचा चोथा

सकाळी चहा केल्यानंतर तुम्ही जे चहाचे छोटे कण (चोथा) फ्रिजमध्ये ठेवा त्यानंतर थंड झाल्यावर पुरुषांनी डोळ्याखाली हलक्या हाताने चोळावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

Dark Circles Remedy
Dark Circle Solution : जाता जात नाहीत हट्टी डार्क सर्कल्स? ट्राय करा ऋजुता दिवेकर यांच्या खास टिप्स

टॉमेटो

टॉमेटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. त्वचेला ग्लो प्राप्त होता. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाटा रस (काही थेंब) एकत्र करुन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे. दोन मिनीट ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.

बटाटा

डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी बटाटा रामबाण उपाय आहे. कच्च्या बटाट्याचा ज्यूस काढून घ्या. कापसाचा छोटा तुकडा बटाटाच्या रसात भिजवून डोळ्याभोवती ठेवा.

काळी वर्तुळे असलेल्या संपूर्ण भागावर कापूस ठेवला जाईल याची काळजी घ्या. एका आठवड्याच्या आत तुम्हाला परिणाम दिसायला सुरुवात होईल.

Dark Circles Remedy
Dark Lips Remedy काळे पडलेले ओठ होतील नैसर्गिकरित्या गुलाबी, वापरा ‘हे’ आयुर्वेदिक तेल

लाइफस्टाइलमध्ये करा हा बदल

पुरेशी विश्रांती घ्या

तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे डोळ्याखाली काळे डाग तयार होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या. विश्रांती ही महत्वाची आहे. त्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन काळे पडणार नाहीत.

 स्क्रीन टाईम कमी करा

कामामुळे लॅपटॉप मोबाईल वापरणं गरजेचं असलं. तरीही त्याव्यतिरिक्त तुम्ही देत असलेले स्क्रीन टाईम कमी करा. १० तास काम करूनही तुम्ही घरी येऊन किंवा प्रवासात मोबाईल पाहत बसलात तर त्यामुळे डोळ्यांवर जास्त इफेक्ट होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com