Hair Care : 'हे' सोपे व्यायाम करा आणि व्यस्त जीवनशैलीत केसांची निगा राखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Care

Hair Care : 'हे' सोपे व्यायाम करा आणि व्यस्त जीवनशैलीत केसांची निगा राखा

हल्लीच्या स्पर्धेच्या काळात सर्वांचेच जीवन फार धावपळीचे असते. जेमतेम आवरायचे आणि कामाला पळायचे साधारण असे असते. अशात केसांच्या काळजीसाठी द्यावा लागणारा वेळ लोकांकडे नसतो. तासन् तास केसांना पॅक लावणे किंवा ट्रिटमेंट करणे शक्य होत नाही. व्यस्त कामाचे वेळापत्रक आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीचा तुमच्या केसांवर परिणाम होण्यापासून रोखण्यासाठी या व्यायामांचा तुमच्या दिनक्रमात समावेश करा.

हेही वाचा: Hair Care Tips: या वेळेत चुकनही लावू नका केसांना तेल, गळू शकतात मोठ्या प्रमाणात केस

मानेचे व्यायाम

साईड टू साईड यासारखा मानेचा सोपा व्यायाम फक्त तुमच्या मानेच्या आणि खांद्यांमधल्या स्नायूंसाठीच चांगल्या असतात असे नाही, तर ते डोक्यात रक्ताभिसरण वाढवण्यासही मदत करतात.

श्वासोच्छवासाचे व्यायाम

केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे तणाव आणि चिंता. श्वासोच्छवासाचे सोपे व्यायाम मनाला शांत करण्यास मदत करतात, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यास मदत होते.

हेही वाचा: Hair Care : पांढऱ्या केसांसाठी कढीपत्ता ठरतंय वरदान; असा करा वापरा

टाळूची मालिश

स्कॅल्प मसाज केल्याने रक्त परिसंचरण सुधारते. केसांच्या चांगल्या वाढीसाठी. दररोज काही वेळ केसांच्या तेलाने मालिश करा.

शीर्षासन

शीर्षासनाचा सराव करायला हवा. कारण ते डोक्यात रक्तप्रवाहास प्रोत्साहन देते तसेच केसांच्या कूपांना अतिरिक्त पोषक आणि ऑक्सिजन वितरीत करते.

हेही वाचा: Hair: केराटिन ट्रीटमेंटसारखी चमक येईल तुमच्या केसांना फक्त 10 रुपयांत, हा रस फक्त तुम्ही केसांना लावा

जॉगिंग

कार्डिओ व्यायाम केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत. जॉगिंग किंवा HIIT मुळे रक्त पंपिंग होते. ज्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते.

साईड हॉप्स

साईड हॉप्स सारख्या हालचाली केसांच्या वाढीस देखील मदत करतात. तणाव आणि चिंता कमी करून मूड सुधारण्याबरोबरच ते संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात.

हेही वाचा: Hair Care : केसांची दुर्गंधी या उपायांनी घालवा

आयुर्वेदिक हेड मसाज

हे हेड मसाज दक्षिण आशियात खूप लोकप्रिय आहे. यामध्ये विशिष्ट अॅक्युप्रेशर पॉइंट्सवर तालबद्ध हालचाली केल्या जातात, ज्यामुळे डोकेदुखी, केस पांढरे होणे, टक्कल पडणे यासारख्या केसांच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Web Title: Hair Care Maintain Hair In Busy Schedule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hairexerciseHair Care