Hair Colour : मेहंदी,डायची ऍलर्जी आहे तर केसांना अंडी लावा, केस काळे कुळकुळीत होतील!

अंड्याचा पांढरा, तेलकट केसांसाठी वापरला जाऊ शकतो
Hair Colour
Hair Colour esakal

Hair Colour :

केस काळे करण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. काहीतर इतकं फास्ट काम करतात की १० मिनिटात तुमचे केस काळे होतात. केसांना काळे बनवण्यासाठी पुर्वीपासून मेहंदीचा वापर केला जातो. पण सध्या इंस्टंट गोष्टींचा जमाना आहे.

मात्र या गोष्टींचा सतत वापर केसांसाठी हानिकारक ठरू शकतो. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये रसायने असतात. त्यामुळे तुम्हालाही कोणतेही केमिकल प्रोडक्ट न वापरता केस काळे करायचे असतील तर घरगुती उपायच बेस्ट ठरू शकतात.

Hair Colour
Hair Care Tips : कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी लिंबाच्या सालींचा अशा प्रकारे वापर करा, जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला अशाच पदार्थांबद्दल सांगत आहोत जे सहसा नाश्त्यामध्ये खाल्ले जाते. हो तुमचा अंदाज बरोबर आहे. अंडी हा असाच एक घटक आहे जो सामान्यतः नाश्त्यात खाल्ला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की अंड्याने केस काळे करता येतात.

अंड्यात असलेले पोषक घटक 

अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रथिने, कॅल्शियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम मजबूत आणि निरोगी केसांसाठी असते. अंड्याचा पांढरा, तेलकट केसांसाठी वापरला जाऊ शकतो. अंड्यातील पिवळ बलक कोरड्या केसांचे पोषण करण्यासाठी आणि त्यांना चमकदार बनवण्यासाठी आणि त्यांना पडण्यापासून रोखण्यासाठी चांगले आहे.(Hair Care)

Hair Colour
Hair Mask :केसांना मुलतानी माती लावण्याचेही ढिगभर फायदे, प्रयोग करून पहा

अंड्यापासून डाय कसा बनवायचा?

  • यासाठी अंड्यांचा पांढरा भाग, मोहरीचे तेल, खोबरेल तेल आणि लिंबूचा रस लागेल.

  • प्रथम एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग काढून घ्या.

  • यामध्ये मोहरी आणि खोबरेल तेल घाला.  

  • आता यात लिंबाचा रस घाला.

  • या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि हे मिश्रण केसांना लावा आणि २-३ तासांनी केस धुवा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा लावू शकता. (Hair Dye)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com